मुक्ताईनगर तालुक्यात १७ लाखांच्या गुटख्यासह वाहन जप्त ; विशेष पोलीस महानिरिक्षकांच्या पथकाची कारवाई

मुक्ताईनगर तालुक्यात १७ लाखांच्या गुटख्यासह वाहन जप्त ; विशेष पोलीस महानिरिक्षकांच्या पथकाची कारवाई

मुक्ताईनगर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) विशेष पोलीस महानिरिक्षकांच्या पथकाने मुक्ताईनगर तालुक्यातून (Muktainagar Taluka) एका पीकअप (Pick Up)वाहनातून तब्बल १७ लाख रूपयांच्या गुटख्यासह तब्बल २१ लाखांचा ऐवज जप्त केल्याने खळबळ उडाली आहे.[ads id="ads1"] 

मुक्ताईनगर तालुक्यातून (Muktaianagar Taluka) अवैध गुटख्याची मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याचे आधी देखील दिसून आले आहे. विशेष करून या भागातूनच आंतरराज्यीय गुटखा तसेच अन्य प्रतिबंधीत पदार्थांची वाहतूक होत असल्याची चर्चा नेहमीच रंगत असते. याच अवैध गुटख्यावर नाशिक (Nashik) येथील विशेष पोलीस महानिरिक्षक अर्थात आयजींच्या पथकाने धडक कारवाई केली.[ads id="ads2"] 

यात आयजी यांचे पथक हे मुक्ताईनगर तालुक्यात (Muktainaagr Taluka) गस्त घालत असतांना त्यांना मुक्ताईनगर ते बर्‍हाणपूर (Muktaianagar To Burhanpur) या मार्गावर एमएच१९ बीएम ५४०० या पीकअप वाहनातून अवैध गुटखा नेला जात असल्याची माहिती मिळाली. या अनुषंगाने रात्री पथकाने सापळा रचला. मध्यरात्रीच्या सुमारास आरटीओ चेक पोस्टजवळ (RTO Check Post) सदर वाहनाची तपासणी केली असता यात तब्बल १७ लाख रूपयांचा गुटखा आढळून आला. हा गुटखा आणि चार लाख रूपयांचे वाहन असा एकूण २१ लाख रूपयांचा ऐवज आयजींच्या पथकाने जप्त केला आहे.

 👉 हेही वाचा :- विद्यापीठाचे पदवी प्रदान समारंभ होणार बंद - आता विद्यार्थ्यांना मिळणार 'अशी' पदवी 

👉 हेही वाचा :-   दिवाळी, भाऊबीज शुभेच्छा,वाढदिवस बॅनर आणि सर्व प्रकारचे बॅनर बनवा अगदी काही मिनिटात तेही तुमच्याच मोबाइल वरून तेही अगदी मोफत

दरम्यान, या वाहनावरील चालक चेतन सुभाष झांबरे ( वय ३२, रा. कोथळी, ता. मुक्ताईनगर) आणि त्याच्या सोबतचा व्यक्ती हा विनायक मनोहर चांदेलकर ( वय १९, रा. बोदवड) हे असल्याचे दिसून आले. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार अवैध गुटख्याचा साठा हा अनुपम गोसावी ( रा. मुक्ताईनगर) याच्या मालकीचा असल्याचे निष्पन्न झाले. या अनुषंगाने मुक्ताईनगर पोलीस स्थानकात (Muktaianagr Police Station) या तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जाहिरात


Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️