‘अनाम वीरा जिथे जाहला तुझा जीवनांत! स्तंभ तिथे ना कुणी बांधला, पेटलली न वात!! भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीच्या अमृत महोत्सवात कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या या ओळी आठवल्यात तर बोटावर मोजण्या इतक्या स्वातंत्र सैनिकांच्या योगदानाची इतिहासाने दखल घेतली असल्याचे दिसून येते. देशाच्या कान्याकोपऱ्यात ज्या प्रमाणे स्वातंत्र्यासाठी प्राणाची आहुती देणारे होते, तसे ते अकोल्यातही आहेत. या स्वातंत्र्य सैनिकांची ओळख आजच्या पिढीला व्हावी व हा ऐतिहासिक ठेवा कायम प्रेरणादायी रहावा म्हणून अकोल्यातील नीलेश देव मित्रमंडळाने काळाच्या पडद्याआड जाऊ पहाणाऱ्या अकोला जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिकांच्या छायाचित्राचा संग्रह केला. [ads id="ads2"]
त्यातून ‘स्पंदने स्वातंत्र्याची’ हे छायाचित्र प्रदर्शन भरविले. आता हा छायाचित्र संग्रह स्वातंत्र्य सैनिकांचे स्मरण पुढे कायम रहावे म्हणून पुस्तक स्वरुपात संग्रहित करण्यात आला आहे. ज्येष्ठ नाट्यकलावंत दिलीप देशपांडे यांच्या सहकार्याने ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक अच्युतराव देशपांडे, केशवराव ओक, विनायक गणपतराव बोराडे यांनी लिहिलेल्या पुस्तकातून आणि जिल्हा प्रशासनाकडील यादीतून स्वातंत्र्य सैनिकांची माहिती गोळा करून स्वातंत्र्य सैनिकांचे पेन्सिल स्केच चित्रकला महाविद्यालयाचे प्राचार्य गजानन बोबडे यांच्या सहकार्याने तयार केले. हाच छायाचित्रांचा संग्रह ‘स्पंदने स्वातंत्र्याची’ या पुस्तक स्वरुपात नीलेश देव मित्रमंडळाने उपलब्ध करून दिला आहे.
हेही वाचा :- गट नंबर टाकून 1880 सालापासूनचे जमिनीचे नकाशे, सातबारा उतारा, फेरफार नोंदी पहा थेट आपल्या मोबाईल वर
हेही वाचा :- Pm Kisan Scheme च्या हप्त्याचे 2000 हजार रुपये कोणा - कोणाला मिळतील यादीत नाव आहे की नाही ? येथे क्लिक करून यादी पहा
हेही वाचा : - Majhi Kanya Bhagyashree Scheme : एक मुलगी असेल तर मिळणार ५० हजार रुपये असा करा अर्ज
हेही वाचा :- अटल पेंशन योजनेतंर्गत मिळणार 5000 हजार रुपये महिना
हेही वाचा : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी मदत जाहीर ! हे जिल्हे झाले पात्र : पहा तुमचा जिल्हा आहे की नाही (संपूर्ण यादी व शासन निर्णय पाहा)
रेशन कार्ड धारकांसाठी खुशखबर🌾 यांना मिळणार 3 महिने मोफत राशन
या पुस्तकाचे प्रकाश ॲड. प्रकाश आंबेडकर व प्रा. अंजलीताई आंबेडकर यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, महासचिव अरुंधती सिरसाट, वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे, नीलेश देव यांच्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे व इतर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.