एरंडोल तालुक्यातील पिंपळकोठे प्र.चा. ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार


एरंडोल (अमीर पटेल)

एरंडोल तालुक्यातील पिंपळकोठा प्र.चा.ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभारामूळे अनेक वर्षापासून गावातील विकास कामे रखडलेले आहेत.नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.आरोग्य विभागाने व गटविकास अधिकारी यांनी स्वताः या गावाकडे लक्ष द्यावे.महाराष्ट्र मध्ये लिम्पी आजार सुरु आहे तरी या गावात घाणीचे साम्राज्य पसरले आहे डेंग्यू सारख्या आरोग्यास घातक आजाराची साथ पसरण्याच्या मार्गावर आहे ग्रामपंचायत अशा परिस्थितीकडे दुर्लक्ष करीत आहे.[ads id="ads1"] 

गावातील नागरिकांनी अनेक वेळी सरपंच यांना गटारी रोड बनवण्यासाठी विनंती केली सरपंच हे नागरिकांना घरपट्टी व पाणि पट्टी भरण्याची धमकी देत आहे.गावातील नागरिक ग्राम पंचायतीची थकबाकी भरण्यास सक्षम व तयार आहेत.पण ग्राम पंचायत मध्ये विकास कामासाठी जो निधि शासनाकडून येतो.तो कुठे जातो.गावात विकास फक्त कागदोपत्री आहे का? विकास कामे कुठे आहे.विकास कामे ग्रामस्थांना कुठेच दिसून येत नाहीत.[ads id="ads2"] 

        इंद्रानगर प्लाँट येथे जिल्हा परिषदेची शाळा आहे.गावातील लहान मुले शाळेत जात असतात. पुलावरून पाणी वाहतअसतांना शाळेत जाणाऱ्या लहान मुलांच्या जिवाला धोका आहे .

काही महिन्यापुर्वी एका व्यक्तीने पुलावरून पाणी वाहत असता पुल ओलांडताना पाण्यात वाहून आपला प्राण गमावला आहे तरी ग्रामपंचायत झोपेचे सोंग करीत आहे.गावातील समस्यावर शासनाने ताबडतोब लक्ष द्यावे व गावातील विकास कामाचा निधी गेला कुठे याची चौकशी करावी अशी नागरिकांची मागणी करीत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️