विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी रावेर तालुक्यातील विवरे बु येथे क्लिनिक चालवणाऱ्या डॉक्टरविरुद्ध निंभोरा पोलिसात गुन्हा दाखल

 


विवरे बु ता.रावेर (समाधान गाढे) अलोपॅथीची औषधी लिहून देण्यास सक्षम नसतांना महिला रुग्णावर निष्काळजीपणे प्राथमिक उपचार करुन तिच्या मृत्यूस कारणीभूत झाल्याच्या आरोपाखाली डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. [ads id="ads1"] 

  रावेर तालुक्यातील विवरा बुद्रुक (Vivare Bk Taluka Raver) येथील समर्थ क्लिनिक चालवणारे डॉ. प्रशांत सोपान अहिरे यांच्याविरुद्ध निंभोरा पोलिस स्टेशनला (Nimbhora Police Station)  हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गायत्री सचिन पाटील (28) असे मृत्यु झालेल्या महिला रुग्णाचे नाव आहे.[ads id="ads2"] 

गायत्री सचिन पाटील या महिला रुग्णावर डॉ. प्रशांत अहिरे यांनी त्यांच्या विवरा या गावी असलेल्या समर्थ क्लिनिक (Samarth Clinic Vivare Bk) मधे 13 मे 2021 रोजी उपचार केले होते. उपचारादरम्यान गायात्री पाटील यांचे निधन झाले होते. 

हेही वाचा :- गट नंबर टाकून 1880 सालापासूनचे जमिनीचे नकाशे, सातबारा उतारा, फेरफार नोंदी पहा थेट आपल्या मोबाईल वर

हेही वाचा :- Pm Kisan Scheme च्या  हप्त्याचे 2000 हजार रुपये कोणा - कोणाला मिळतील यादीत नाव आहे की नाही ? येथे क्लिक करून यादी पहा

हेही वाचा : - Majhi Kanya Bhagyashree Scheme : एक मुलगी असेल तर मिळणार ५० हजार रुपये असा करा अर्ज

हेही वाचा :- रावेर पंचायत समितीतील शौचालय गैरव्यवहार प्रकरणी गटविकास अधिकाऱ्यांची चौकशी

या घटनेप्रकरणी 30 सप्टेबर 2022 रोजी पोलिस उप निरीक्षक काशिनाथ श्रावण कोळंबे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार डॉ. प्रशांत अहिरे यांच्याविरुद्ध भा.द.वि. 304 (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक गणेश धुमाळ करत आहेत.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️