प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना (PMGKAY) या नावाने प्रसिद्ध असलेली मोफत रेशन योजना येणाऱ्या तीन महिन्यांसाठी वाढवण्यात आली आहे, अशी घोषणा सरकारने बुधवारी केली आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, केंद्रीय मंत्रिमंडळाने PMGKAY योजना पुढील तीन महिन्यांसाठी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना (PMGKAY) मार्च २०२० मध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा (NFSA) अंतर्गत समाविष्ट असलेल्या सुमारे ८० कोटी लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती प्रति महिना पाच किलो अन्नधान्य मोफत देण्यासाठी सुरू करण्यात आली होती.[ads id="ads2"]
टप्प्या-टप्प्याने वाढली योजना
२०२०-२१ मध्ये जेव्हा मोफत रेशन योजना सुरू करण्यात आली तेव्हा PMGKAY योजना केवळ तीन महिन्यांच्या कालावधीसाठी – एप्रिल, मे आणि जून २०२० (पहिला टप्पा) साठी जाहीर करण्यात आली होती. नंतर, सरकारने ही योजना जुलै ते नोव्हेंबर २०२०२ (दुसरा टप्पा) पर्यंत वाढवली. त्यानंतर कोविड-१९ रोग देशभरात कहर करत असताना सरकारने मे आणि जून २०२१ या दोन महिन्यांसाठी मोफत रेशन योजना पुन्हा सुरू केली. त्यांनतर पुन्हा आणखी पाच महिन्यांसाठी नोव्हेंबर २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय जाहीर केला.
हेही वाचा :- गट नंबर टाकून 1880 सालापासूनचे जमिनीचे नकाशे, सातबारा उतारा, फेरफार नोंदी पहा थेट आपल्या मोबाईल वर
हेही वाचा :- Pm Kisan Scheme च्या हप्त्याचे 2000 हजार रुपये कोणा - कोणाला मिळतील यादीत नाव आहे की नाही ? येथे क्लिक करून यादी पहा
हेही वाचा : - Majhi Kanya Bhagyashree Scheme : एक मुलगी असेल तर मिळणार ५० हजार रुपये असा करा अर्ज
रेशनकार्डधारकांसाठी सरकारकडून पुन्हा मोठी बातमी आली आहे. पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना (PMGKAY) आणखी तीन महिन्यांसाठी वाढवण्यात आली आहे. आता या योजनेंतर्गत शिधापत्रिकाधारकांना डिसेंबरपर्यंत शासनाकडून मोफत रेशनचा लाभ मिळणार आहे.
हेही वाचा : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी मदत जाहीर ! हे जिल्हे झाले पात्र : पहा तुमचा जिल्हा आहे की नाही (संपूर्ण यादी व शासन निर्णय पाहा)
रेशन कार्ड धारकांसाठी खुशखबर🌾 यांना मिळणार 3 महिने मोफत राशन
त्यानंतर पाचव्या टप्प्यात मोफत रेशन योजना पाचव्यांदा मार्च २०२२ पर्यंत वाढवण्यात आली. २६ मार्च रोजी केंद्राने गरिबांना ५ किलो धान्य मोफत देण्याची योजना ३० सप्टेंबरपर्यंत ८० हजार कोटी रुपयांच्या सहा महिन्यांपर्यंत वाढवली. दरम्यान, PMGKAY अंतर्गत एकूण खर्च जवळपास ३.४० लाख कोटींवर पोहोचला आहे.