दुचाकी - ट्रकच्या धडकेत मामा-भाची जागीच ठार : जळगाव जिल्ह्यातील घटना

 दुचाकी - ट्रकच्या धडकेत मामा-भाची जागीच ठार : जळगाव  जिल्ह्यातील घटना


चोपडा (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : दिवाळीनिमित्त बहिणीला माहेरी नेत असलेल्या भावाच्या दुचाकीला समोर आलेल्या भरधाव ट्रकने उडवल्याने मामा-भाचीचा जागीच मृत्यू झाला तर विवाहिता गंभीर जखमी झाली. हा भीषण असा अपघात चोपडा (Chopda) तालुक्यातील रेल मारुती मंदिराजवळ शुक्रवारी दुपारी घडला. विधी कोळी (6, दहिदुले, ता.धरणगाव) व आबा कोळी (विरवाडे, ता.चोपडा) अशी मयतांची नावे आहेत.[ads id="ads1"] 

दुचाकी अपघातात दोघे ठार

शुक्रवार दिनांक 28 ऑक्टोंबर 2022 रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास रेलच्या मारुती मंदिरासमोरील नागमोडी वळणावर चोपड्याकडून धरणगावकडे जाणारी दुचाकी (क्र.एम.एच. 19 सी.एच.5174) ला समोरून येणारा ट्रक (क्र.एच.आर. 56 बी. 4688) ने जोरदार धडक दिल्याने मामा-भाची जागीच ठार झाले तर विवाहिता गंभीर जखमी झाले.[ads id="ads2"] 

धरणगाव तालुक्यातील दहिदुले (Dahidule Taluka Dharangaon Dist Jalgaon)  येथील सासर व विरवाडे, ता.चोपडा येथील माहेर असलेली विवाहिता दिवाळी सणानिमित्त मुलगी विधीसह भाऊ आबासोबत दुचाकीने माहेरी जाण्यासाठी निघाली होती मात्र क्रुर काळाने झडप घातल्याने मामा-भाची अपघातात ठार झाले तर विवाहिता गंभीर जखमी झाली तर विवाहितेचा दिड वर्षीय चिमुकला सुखरूप बचावला आहे. अपघाताची माहिती मिळतात चोपडा पोलिसांनी (Chopda Police) घटनास्थळी धाव घेत जखमींना चोपडा उपजिल्हा रुग्णालयात (Chopda Upjilha Hospital) दाखल केले. या अपघातामुळे दुतर्फा वाहतूक काही काळासाठी प्रभावीत झाली.

👉 हेही वाचा :- विद्यापीठाचे पदवी प्रदान समारंभ होणार बंद - आता विद्यार्थ्यांना मिळणार 'अशी' पदवी 

👉 हेही वाचा :-   दिवाळी, भाऊबीज शुभेच्छा,वाढदिवस बॅनर आणि सर्व प्रकारचे बॅनर बनवा अगदी काही मिनिटात तेही तुमच्याच मोबाइल वरून तेही अगदी मोफत

👇इथे क्लिक करून तपासा 👇

 (संपूर्ण भारतातील P M Kisan Sanman Nishi यादी पाहा - गावानुसार)

हेही वाचा :- आपल्या कडे पिवळे कार्ड आहे तर मग ही बातमी तुमच्या कामाची आहे  दारिद्रयरेषेखालील कुटुंबाना कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेतंर्गत मिळणार चार एकर कोरडवाहू व दोन एकर बागायती शेतजमीन

हेही वाचा :- महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती प्रोत्साहन पर योजना म्हणजेच ५० हजार रुपये प्रोत्साहन पर योजनेची जळगाव जिल्ह्याची पात्र यादी (गावानुसार) पहा

हेही वाचा :- गट नंबर टाकून 1880 सालापासूनचे जमिनीचे नकाशे, सातबारा उतारा, फेरफार नोंदी पहा थेट आपल्या मोबाईल वर

हेही वाचा :- आपल्याकडे असलेला बंद किंवा तुटलेल्या फोनवरही मिळणार आता 2000 रुपये..! ‘जिओ’ची भन्नाट ऑफर

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️