कुशीनगर एक्स्प्रेसच्या दरवाजात उभे असलेल्या बर्‍हाणपूरच्या युवकाचा रेल्वे मधून खाली पडल्याने मृत्यू ; सावदा रेल्वे स्थानकाजवळील घटना

कुशीनगर एक्स्प्रेसच्या दरवाजात उभे असलेल्या बर्‍हाणपूरच्या युवकाचा रेल्वे मधून खाली पडल्याने मृत्यू ; सावदा रेल्वे स्थानकाजवळील घटना

भुसावळ : बर्‍हाणपूर (Burhanpur) येथून भुसावळकडे(Bhusawal)  कुशी नगर एक्स्प्रेसच्या (Krishinagar Express) दरवाजात उभा राहून प्रवास करीत असलेला प्रवासी हलीमखान जाफरखान तापडीया (21, रा. बर्‍हाणपूर) हा तोल गेल्याने धावत्या गाडीतून खाली पडल्याने मयत झाला. [ads id="ads1"] 

  सदर ही घटना रविवारी सकाळी 9 ते 10 वाजेच्या दरम्यान घडली.हा प्रकार लक्षात येताच नातेवाईकांनी गाडीची चेन ओढून गाडी थांबविली. तरुणाचा मृतदेह गोवा एक्स्प्रेसने (Goa Express) भुसावळ येथे आणण्यात आला. याप्रकरणी लोहमार्ग पोलिस (Railway Police) ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.[ads id="ads2"] 

तोल गेल्याने तरुणाचा मृत्यू

लोहमार्ग पोलिसांनी (Railway Police)  दिलेली माहिती अशी की, रविवारी सकाळी बर्‍हाणपूर येथून हलीमखान हा त्याच्या मित्र व नातेवाईकांसह कुशी नगर एक्स्प्रेस(Krushinagar Express)  गाडीने भुसावळकडे येत होता. गाडीने सावदा स्थानक सोडल्यावर दरवाजात उभ्या असलेल्या हलीमखान याचा झोल गेल्याने तो धावत्या गाडीतून थेट गाडीच्या खाली पडला. 

हेही वाचा :- रावेर येथे घरातून 48 हजारांचा ऐवज लंपास : पोलिसात अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल 

हेही वाचा :- SSC GD Constable 2022 : दहावी पास उमेदवारांसाठी खुशखबर : SSC मध्ये बंपर भरती, 24 हजारहून अधिक पदे रिक्त, असा करा अर्ज

हेही वाचा :- सावद्यात आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी ; जमावाने दुचाकीसह चारचाकींची केली तोडफोड ; सावदा पोलिसात संशयितांवर गुन्हा दाखल

हेही वाचा:- प्रहार दिव्यांग संघटना तर्फे रावेर पोलीस स्टेशन मध्ये रवी राणा विरोधात गुन्हा दाखल करण्याची निवेदनाद्वारे मागणी 

गाडी वेगात असल्याने त्याचा मृतदेह हा जवळच असलेल्या झाडांमध्ये पडला. यावेळी सोबतच्या लोकांनी गाडीची चेन पुलिंग करून गाडी थांबवली मात्र लवकरच हलीमखानचा मृतदेह सापडला नसल्याने गाडी भुसावळकडे मार्गस्थ झाली. याप्रकरणी लोहमार्ग पोलिस ठाण्यात (Railway Police Station) अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️