सावद्यात आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी ; जमावाने दुचाकीसह चारचाकींची केली तोडफोड ; सावदा पोलिसात संशयितांवर गुन्हा दाखल

 


सावदा (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : सावदा शहरातील(Savda City) एका तरुणाने इन्स्टाग्राम (Instragram) या सोशल मिडीया साईटवर (Social Media Website) एका समाजाबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद सावदा शहरात (Savda City) उमटले. संतप्त जमावाने शनिवारी रात्री साडेनऊ वाजता सावदा पोलिस ठाणे (Savda Police Station) गाठून दोषीवर कारवाईची मागणी केली तर पोलिसांनी कारवाईचे आश्वासन देत जमावाला पांगवल्यानंतर संतप्त जमावाने रस्त्यावर उभ्या असलेल्या दोन दुचाकीसह एका चारचाकीची तोडफोड केल्याने सावदा शहरात (Savda City) प्रचंड तणाव पसरला. सावदा पोलिसांनी (Savda Police Station) तातडीने गावात कुमक तैनात करीत परीस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणी जमावाविरोधात तसेच आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या तरुणाविरोधात सावदा पोलीस स्थानकात (Savda Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला.[ads id="ads1"] 

तीन वाहनांचे नुकसान

सूत्रांने दिलेल्या माहितीनुसार, सावदा शहरातील (Savda City) तरुणाने एका समाजाविषयी आक्षेपार्ह पोस्ट इन्स्टाग्रामवर (Instagram) पोस्ट केली होती. ही पोस्ट व्हायरल (Post Viral) झाल्यानंतर एका समाजाचे लोक संतप्त होवून पोलिस ठाण्याबाहेर जमले व तरुणाविरोधात कारवाईची मागणी करण्यात आली. पाहता-पाहता मोठ्या प्रमाणावर जमाव जमल्याने परीस्थिती चिघळत जात असल्याचे पाहून सावदा पोलिस स्टेशनचे सहा.निरीक्षक डी.डी.इंगोले यांनी जमावाला कारवाईचे आश्वासन देत पांगवल्यानंतर संतप्त जमावाने शहरातील गांधी चौक, चांदणी चौक आदी भागातील दोन दुचाकीसह एका चारचाकीच्या काचा फोडल्या.[ads id="ads2"] 

तीन संशयीताना पोलिसांनी घेतले ताब्यात ; दोन गुन्हे दाखल 

या प्रकाराची माहिती मिळताच सावदा पोलीस स्थानकाचे(Savda Police Station) एपीआय देविदास इंगोले व सहकाऱ्यांनी यांनी घटनास्थळी धाव घेतली. जळगाव जिल्हा मुख्यालयातून अतिरिक्त कुमक मागवून परीस्थिती नियंत्रणात आणण्यात आली. 

हेही वाचा :- SSC GD Constable 2022 : दहावी पास उमेदवारांसाठी खुशखबर : SSC मध्ये बंपर भरती, 24 हजारहून अधिक पदे रिक्त, असा करा अर्ज

दरम्यान, आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास ताब्यात घेण्यात आले असून तसेच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणाऱ्या जमावाविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन संशयीतांना ताब्यात घेण्यात आले आहे. सावदा शहरातील स्थिती नियंत्रणात असून कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️