रावेर शहरातील मदिना कॉलनीतील 13 वीज चोरट्यांविरोधात महावितरणच्या पथकाची धडक कारवाई

https://www.suvarndip.com/2022/10/Mahavitran-strike-action-against-13-electricity-thieves-in-Raver-City.html


 रावेर(सुवर्ण दिप वृत्तसेवा)  : रावेर शहरातील मदिना कॉलनीत (Madina Colony,Raver City)  13 वीज चोरट्यांविरोधात महावितरणच्या पथकाने वीज चोरी केल्याप्रकरणी कारवाई केल्याने शहरात मोठी खळबळ उडाली. कारवाई दरम्यान मोठ्या प्रमाणात स्थानिक नागरीकांची मोठी गर्दी झाल्याने ती नियंत्रणासाठी पोलिसांना पाचारण करण्यात आले.[ads id="ads1"] 

कारवाईने शहरात खळबळ

महावितरण (Mahavitaran)  विभागातर्फे रावेर शहरात (Raver City) वीज चोरी करणाऱ्यांविरुध्द मोहिम राबवण्यात आली. महावितरणचे उप कार्यकारी अभियंता अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मदिना कॉलनीत 13 वीज चोरट्यांविरोधात कारवाई करण्यात आली असून संबंधिताना दंड देण्यात येणार आहे. [ads id="ads2"] 

  रावेर शहरात (Raver City)  ही मोहिम अशाच पद्धत्तीने सुरू राहणार असून कुणीही वीज चोरी करू नये, रीतसर कनेक्शन घेण्याचे आवाहन सहाय्यक अभियंता दिलीप सुंदराणी यांनी केले. या पथकात समीर तडवी, देवेंद्र महाजन, संतोष जाधव, कर्मचारी सतीश चौधरी, भिका साळुंखे, अमोल हिवरे, धनंजय पाटील, चंद्रकांत ठाकूर, चेतन भरते, दिलीप कोष्टी, अरुण माळी, कल्पेश पाटील, महेश चौधरी यांचा समावेश होता.

हेही वाचा :- महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती प्रोत्साहन पर योजना म्हणजेच ५० हजार रुपये प्रोत्साहन पर योजनेची जळगाव जिल्ह्याची पात्र यादी (गावानुसार) पहा

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️