रावेर येथे घरातून 48 हजारांचा ऐवज लंपास : पोलिसात अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल

 


 रावेर तालुका प्रतिनिधी ( विनोद कोळी) रावेर शहरातील आसार बर्डी (Aasarbardi Raver City) परीसरातील एका घरातील कपाटातील लॉकर (Locker)तोडून सोने-चांदीच्या दागिण्यांसह रोकड मिळून 48 हजारांचा ऐवज चोरीला गेला. ही घटना रविवारी घडली. या प्रकरणी महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञात(Unknown) चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.[ads id="ads1"] 

पतीने चोरी केल्याचा पत्नीला संशय

रावेर शहरातील आसरा बर्डी (Aasarbardi Raver City) भागातील प्रमिला विकास सवर्णे यांच्या घरातील कपाटाचे लॉकर तोडून 30 हजार रुपये किंमतीचे आठ ग्रॅम वजनाचे सोन्याच्या गहू मण्यांची पोत, आठ हजार रुपये किंमतीचे 40 भार चांदीचे कडे तसेच दहा हजारांची रोकड मिळून 48 हजारांचा ऐवज लांबवण्यात आला.[ads id="ads2"] 

   याबाबत प्रमिला सवर्णे यांनी पोलिसात तक्रार दिल्यानंतर अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. 

हेही वाचा :- कुशीनगर एक्स्प्रेसच्या दरवाजात उभे असलेल्या बर्‍हाणपूरच्या युवकाचा रेल्वे मधून खाली पडल्याने मृत्यू ; सावदा रेल्वे स्थानकाजवळील घटना

हेही वाचा :- SSC GD Constable 2022 : दहावी पास उमेदवारांसाठी खुशखबर : SSC मध्ये बंपर भरती, 24 हजारहून अधिक पदे रिक्त, असा करा अर्ज

दरम्यान, पत्नीने हे दागिणे पतीने चोरल्याचा संशय व्यक्त केल्यानंतर त्यास पोलिसांनी चौकशीकामी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सहायक फौजदार इस्माईल शेख करीत आहे.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️