जळगाव प्रतिनिधि (विनोद कोळी )
दि.29/9/222रोजी आदिवासी कोळी समाज बांधव तसेच आदिवासी कोळी महासंघ व आदिवासी संघर्ष समितीची बैठक जिल्हा अध्यक्ष सुभाष सपकाळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली . त्यात कोळी समाजाचे अभ्यासु व्यक्तीमत्व माननीय माजी कॅबिनेट मंत्री श्री.दशरथजी भांडे साहेब, यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यासंदर्भात तसेच आद्यकवी महर्षी वाल्मिकी जंयत्ती साजरी करण्यासाठी आणि मा. मुख्यमंत्री यांनी दिलेल्या आश्वासनाच्या पाठपुरावा व बैठकी संदर्भात सामाजिक व संघटनात्मक विचार विनिमय करण्यासंदर्भात महत्त्वाची बैठक आयोजित केली असून तालुका अध्यक्ष मनोहर कोळी प्रस्तावना मांडली.[ads id="ads1"]
आ.कोळी स. उपाध्यक्ष नितीन भाऊ कोळी यांनी आपल्या मनोगतात काही स्वार्थी लोक समाज्याचा वापर देखावा करून स्वत:ची पोळी समाजकारण भासवून राजकारण करीत आहे तालुक्यात बरेच जेष्ठ,श्रेष्ठ, तंज्ञ विचारवंत,अनेक संघटनेचे जिल्हा, तालुका अध्यक्ष असतांना त्यांना माहीती न देता परस्पर समाज्याच्या ज्वलंत प्रश्नावर अगदी ५/६ लोक लोकप्रतिनिधी मार्फत निवेदन देतात हे समाजासाठी घातक आहे.अशा व्यक्तींना आळा घालणे गरजेचे आहे त्यांना समाजाचे काही देणे घेणे नाही फक्त व्यैक्तीक स्वार्थ ..या विषयावर सर्वानी संमती दर्शवली.बंडु कोळी यांनी तालुका स्तरावर रॅली काढून जयंती साजरी करावी म्हणून सुचवले.[ads id="ads2"]
गंभिरदादांनी जयंती कै, नितीन जैतकर यांच्या कार्याला समर्पित म्हणून साजरी करण्यासाठी तालुका उत्सव समिती स्थापन करण्याची सुचना केली .चंद्रकांत कोळी नवयुवक तरुणांना नेतृत्व केले द साजरी करावी व जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन केले.विश्वनाथ कोळी यांनी भांडे साहेबांच्या माध्यमातून आझाद मैदान वरील उपोषणाची दखल म्हणून मा.आ.चंद्रकांत पाटील यांनी मा.मुख्यमंत्री यांना समाजावर होणार्या अन्याय बाबत भांडे साहेब फार भांडत आहे त्या संदर्भात भांडे साहेबांनी निवेदन दिले त्यावर मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले आहे.तसेच लवकरच मिटींग आयोजित केली जाईल असे आश्वासित केले.अध्यक्षीय मनोगतात सुभाष सपकाळे यांनी समाजिक कार्यासाठी तळमळीने झटणारे कुशल नेतृत्व मा. भांडे साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित केली जावे म्हणून मार्गदर्शन केले.
हेही वाचा :- रावेर पंचायत समितीतील शौचालय गैरव्यवहार प्रकरणी गटविकास अधिकाऱ्यांची चौकशी
हेही वाचा :- गट नंबर टाकून 1880 सालापासूनचे जमिनीचे नकाशे, सातबारा उतारा, फेरफार नोंदी पहा थेट आपल्या मोबाईल वर
हेही वाचा :- Pm Kisan Scheme च्या हप्त्याचे 2000 हजार रुपये कोणा - कोणाला मिळतील यादीत नाव आहे की नाही ? येथे क्लिक करून यादी पहा
हेही वाचा : - Majhi Kanya Bhagyashree Scheme : एक मुलगी असेल तर मिळणार ५० हजार रुपये असा करा अर्ज
साहेब नेहमी आपल्या समाजावर होणारे अन्यायाविरुद्ध अग्रेसर असतात असे अभ्यासु नेतृत्व मिळणे आपले भाग्य आहे.त्यावेळी,आदिवासी कोळी महासंघाच्या तालुका सल्लागार म्हणून निंभोरे येथील पत्रकार राजेंद्र महाले यांची नियुक्ती करण्यात आली.तसेच, तालुका उत्सव समिती स्थापन केली.खालील प्रमाणे...नितीन कोळी अध्यक्ष,सुपडु मोरे उपाध्यक्ष,संतोष पाटील उपाध्यक्ष,राजेंद्र महाले सचिव,विजय तावडे मार्गदर्शक,ईश्वर कोळी सहसचिव,नितीन सपकाळे सल्लागार,विनोद कोळी प्रसिद्धप्रमुख,विवेक चैत्र सह प्रसिद्ध प्रमुख,योगेश्वर कोळी,सदस्य,संदेश सपकाळे सदस्य,रविंद्र सपकाळे सदस्य,जयराम कोळी सदस्य,दिलीप कोळी सदस्य,गोपाल कोळी सदस्य,विक्की कोळी सदस्य,मनोहर पु. कोळी सदस्य,भानु कोळी सदस्य,बंटी कोळी सदस्य,हिरालाल कोळी सदस्य अशी समीती गठीत करण्यात आली.त्यावेळी
चंद्रकांत कोळी युवा अध्यक्ष,
अनिल जैतकर, बादशहा जैतकर, रमेश किंक्राळे, पृथ्वी जैतकर, जितेंद्र टेलर, विजय कोळी, गफ्फुर कोळी,नारायण कोळी,उमेश कोळी आदी वरील सर्व समाज बांधव उपस्थित होते.सुत्रसंचालन मनोहर कोळी यांनी केले तर आभार विनोद कोळी यांनी मानले.