सेवानिवृत्त जवानास अमानुषपणे मारहाण करणाऱ्या चोपडा येथील पोलीस निरीक्षकावर कारवाई करा - रयत सेनेची निवेदनाद्वारे मागणी

 


चाळीसगाव (दत्ता साळुंखे) चोपडा येथील सेवानिवृत्त जवान हे रस्त्याच्या कडेला मोटारसायकल लावून फुलहार घेत असताना किरकोळ कारणावरून चोपडा पोलीस निरीक्षक यांनी त्यांना पोलीस स्टेशनमध्ये बोलावून गुन्हेगारासारखी मारहाण करून कारवाई करणाऱ्या पोलीस निरीक्षक अवतार सिंग चव्हाण यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी रयत सेनेच्या वतीने अप्पर पोलीस अधिक्षक चाळीसगाव यांच्याकडे दि 5 रोजी निवेदनाद्वारे करण्यात आली असून कारवाई न झाल्यास महाराष्ट्र भरातील सेवानिवृत्त जवानांसोबत तिव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.[ads id="ads1"] 

  निवेदनात म्हटले आहे की चोपडा येथील श्री पंकज पाटील हे भारतीय सैन्य दलात हवालदार एएसपी पदावर म्हणून १७ वर्ष आसाम येथे देश सेवेत होते ते सध्या सेवानिवृत्त असून चोपडा येथे वास्तव्यास आहे दि २/९ /२०२२ रोजी सायंकाळी ५ - ३० वाजेच्या सुमारास ते गणपतीच्या पूजेसाठी फुलहार घेण्यास तहसील कार्यालय रोडवरील तलाठी कार्यालयासमोर त्यांच्या मोटरसायकल वरून फुलहार घेत असताना समोरून चोपडा पोलीस निरीक्षक श्री अवतार सिंग चव्हाण हे त्यांच्या शासकीय वाहनातून समोरुन आल्याने पंकज पाटील यांनी त्यांची मोटरसायकल मागे घेण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्या मागे इतर वाहने व मोटरसायकल असल्याने त्यांची मोटरसायकल मागे गेली नाही व रस्त्यावर गर्दी असल्याने पोलीस निरीक्षकांचे वाहन पुढे जाण्यासाठी अडचण येत असल्याने पोलीस निरीक्षक अवतार सिंग चव्हाण हे लागलीच वाहनातून उतरून सेवानिवृत्त जेव्हा श्री पंकज पाटील यांच्याशी आरेरावी व शिवीगाळ करत मोटरसायकलची चावी काढून घेऊन तुम्ही पोलीस स्टेशनला या असे सांगून निघून गेले श्री पाटील लागलीच पोलीस स्टेशनला गेल्याने गेल्यावर पोलीस निरीक्षक श्री चव्हाण हे त्यांना अरेरावी करत आवार्च भाषेत शिवीगाळ केली त्यावर पंकज पाटील यांनी मी सेवानिवृत्त आहे.[ads id="ads2"] 

  फुलहार घेत असताना रस्त्यावर गाडी लागल्याने माझ्याकडून चूक झाली असेल तर माफ करा असे म्हटल्यावर श्री अवतार सिंग चव्हाण यांनी तू जास्त बोलतो आता माझा पोलिस हसीका बघ असे म्हणून मारहाण केली व त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली.

एक जवान देश सेवा करतो म्हणून आपण सर्वजण निर्धास्तपणे राहू शकतो जवान त्यांचे घरदार सोडून थंडी उन वारा पाऊस न पाहता देशसेवा बजावत असतो असे असताना देखील देश सेवा करून सेवानिवृत्त झालेला जवानांना समाजाने व प्रशासनाने सन्मानाची वागणूक दिलीच पाहिजे मात्र चोपडा पोलीस निरीक्षक अवतार सिंग चव्हाण यांनी सेवानिवृत्त श्री पंकज पाटील यांना शिवीगाळ करून अमानुषपणे मारहाण केली तसेच त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली छोटेसे कारण असताना एका सेवानिवृत्त जवानास गुन्हेगाराप्रमाणे वागणूक देऊन अमानुषपणे मारहाण करणाऱ्या चोपडा पोलीस निरीक्षक श्री चव्हाण यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी लवकरात लवकर कारवाई न झाल्यास रयत सेनेच्या वतीने महाराष्ट्रभरातील सेवानिवृत्त जवानांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडले जाईल व याप्रसंगी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास या सर्वस्वी चोपडा पोलीस निरीक्षक श्री अवतार सिंग चव्हाण हेच जबाबदार राहतील असा इशारा देण्यात आला आहे.

निवेदनाच्या प्रति केंद्रीय गृहमंत्री,भारतसरकार,केंद्रीय स्वरक्षणमंत्री,भारतसरकार गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री म. रा. मुंबई, जिल्हा पोलीस अधिक्षक जळगाव, वेल्फेअर अधिकारी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय जळगाव, जिल्हाधिकारी जळगाव, प्रांताधिकारी चाळीसगाव, तहसीलदार चाळीसगाव,

खासदार जळगाव यांना पाठवण्यात आल्या आहेत याप्रसंगी रयत सेना संस्थापक अध्यक्ष गणेश पवार, प्रदेश संघटक संता पैलवान, प्रदेश समन्वयक पी एन पाटील ,उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष आबासाहेब गरुड उपाध्यक्ष गोकुळ पाटील संघटक गोविंद वाघ जिल्हा उपाध्यक्ष अनिल कोल्हे,स्वप्निल गायकवाड तालुका उपाध्यक्ष मुकुंद पवार पवार, भरत नवले ,सतीश पवार ,संदीप पाटील ,किरण आढाव, दीपक देशमुख ,रवींद्र जाधव, रमेश पवार, भूषण पाटील, प्रवीण देसले ,किरण पाटील, जयेश शिंदे ,विजय देवरे, चंद्रकांत पाटील ,विकास पवार ,भूषण चव्हाण, गणेश गोसावी, बाळासाहेब वाळके, दीपक नागणे ,राकेश निकम, कृष्णा नगरचे अध्यक्ष सरपंच मनोज चव्हाण ,योगेश चव्हाण, निलेश चव्हाण, भानुदास चव्हाण ,अल्केश चव्हाण, किरण चव्हाण अदि रयत सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️