वीज कोसळल्याने पिता-पुत्राचा जागीच मृत्यू ; जळगाव जिल्ह्यातील घटना


 शेतामध्ये पिकाला खत देण्यासाठी गेलेल्या वडिलांसह मुलावर अचानक वीज कोसळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची थरारक घटना तालुक्यातील न्हावे (Nhave Taluka Chalisgaon) गावात आज दिनांक 9 सप्टेंबर दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली आहे. या घटनेत सुदैवाने महिला बचावल्या आहे.[ads id="ads1"] 

   सविस्तर वृत्त असे की, चाळीसगाव तालुक्यातील न्हावे (Nhave Taluka Chalisgaon) गावातील आबा शिवाजी चव्हाण (वय-४५) हे वरील ठिकाणी आपल्या कुटुंबासह वास्तव्यास असून त्यांची न्हावे शिवारात शेतजमीन आहे. त्यात यंदा कापूस लागवड करण्यात आली आहे. त्यानुसार आज शुक्रवार ९ सप्टेंबर रोजी सकाळी आबा चव्हाण, पत्नी (नाव माहित नाही) व मुलगा दीपक आबा चव्हाण (वय-१४) हे शेतातील कापसाला खत घालण्यासाठी गेलेले होते. [ads id="ads2"] 

  त्यात दुपारी २ वाजेच्या सुमारास पावसाने हजेरी लागल्याने तिघेजणे शेतातल्या शेवगाच्या झाडाखाली उभे असताना अचानक वीज कोसळली. या घटनेत आबा चव्हाण आणि मुलगा दिपक आबा चव्हाण यांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेत महिला थोडक्यात सुदैवाने बचावल्या आहे. या घटनेने चाळीसगाव (Chalisgaon)तालुक्यात एकच खळबळ उडाली असून ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. मयताच्या पश्च्यात पत्नी, मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. या घटनेमुळे न्हावे गावावर शोककळा पसरली आहे.


जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️