रिपब्लिकन युवा सेनेच्या वतिने दिग्गज कलावंतांचा भीमसंदेश पुरस्काराने गौरव


आंबेडकरी विचार रुजविण्याचे कार्य भीमशाहीर करीत असतात... किरण घोंगडे

औरंगाबाद प्रतिनिधी 

औरंगाबाद शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र येथे दि.25 स्पटेंबर 2022 रोजी,सोलापूर रिपब्लिकन युवासेना आयोजित प्रदेशाध्यक्ष किरण घोंगडे यांच्या अध्यक्षतेखाली दिग्गज कलावंतांना *"भीमसंदेश गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.[ads id="ads1"] 

 महाराष्ट्राचे ख्यातनाम भीमशाहीर तथा सोलापूर चे सुपुत्र कालकथित मनोहर लोकरे यांच्या स्मरणार्थ, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परिवार राजगृह, रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी श्रद्धेय आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या आदेशाने व रिपब्लिकन युवा सेना सोलापुर जिल्हाध्यक्ष सर्पमित्र भीमसेन मनोहर लोकरे यांच्या वतीने या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.[ads id="ads2"] 

 कार्यक्रमाची सुरुवात तथागत गौतम बुद्ध व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व महाकवी वामनदादा कर्डक यांना अभिवादन करून करण्‍यात आली.

 महाराष्ट्राच्या ख्यातनाम गायिका कडुबाई खरात, शाहीर मेघानंद जाधव, शाहीर चरण जाधव, गीतकार धम्मा धनवे, गायक अजय देहाडे, भीम जन्मभूमी महू येथील ख्यातनाम गायक सुनील तायडे, सुप्रसिद्ध संगीतकार हिरल कांबळे (Dj HK Style - मुंबई )* अशा दिग्गज कलावंतांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच सुप्रसिद्ध एडिटर सनी साळवे, सागर नावकर, रील / सोशल मीडिया स्टार विनोद बेगटे, निशिगंधा (निशा) मगरे, पॅंथर संध्याताई खरे, यांना *भीमसंदेश युवारत्न* या विशेष पुरस्काराने सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

हेही वाचा :- रावेर तालुक्यातील ऐनपुर येथे शेतमजूराची आत्महत्या ; परिसरात खळबळ 

हेही वाचा :- गट नंबर टाकून 1880 सालापासूनचे जमिनीचे नकाशे, सातबारा उतारा, फेरफार नोंदी पहा थेट आपल्या मोबाईल वर

हेही वाचा :- Pm Kisan Scheme च्या  हप्त्याचे 2000 हजार रुपये कोणा - कोणाला मिळतील यादीत नाव आहे की नाही ? येथे क्लिक करून यादी पहा

हेही वाचा : - Majhi Kanya Bhagyashree Scheme : एक मुलगी असेल तर मिळणार ५० हजार रुपये असा करा अर्ज

हेही वाचा :- अटल पेंशन योजनेतंर्गत मिळणार 5000 हजार रुपये महिना

 या *कार्यक्रमाचे उद्घाटन हे, आहे कोणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला या सुप्रसिद्ध गीताचे गीतकार जेष्ठ गितकार रामचंद्र जानराव* यांनी केले. व *प्रमुख पाहुणे म्हणून पॅंथर ग्रुपचे संस्थापक तथा सुप्रसिद्ध सर्पमित्र आकाश जाधव* यांची उपस्थिती लाभली.

अध्यक्षीय समारोप करताना घोंगडे म्हणाले तथागत गौतम बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार वस्ती वाड्यावर घरोघरी पोहचवण्याचे काम तमाम कलावंत करित असतात त्यामुळे त्यांची ऊर्जा वाढविण्यासाठी त्यांचा सन्मान केला जावा असे गौरवोद्गार रिपब्लिकन युवा सेना प्रदेशाध्यक्ष सरपंच किरण घोंगडे यांनी बोलताना काढले.

 विचारपिठावर औरंगाबाद पच्छीम जिल्हाध्यक्ष काकासाहेब गायकवाड, शहराध्यक्ष मिलिंद बनसोडे, युवा जिल्हाध्यक्ष राहुल कानडे,डॉ. बाबासाहेब आंबेडकर कलाकार समिती सोलापूरचे मा.अध्यक्ष 

तथा महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध सिनेगीतकार, गायक, संगीतकार, भीम संदेश गायन पार्टीचे प्रमुख तानसेन लोकरे, हिंगोली जिल्हा कार्याध्यक्ष बाळासाहेब गायकवाड,मणेश पुंडगे, धम्मपाल रसाळ, सोलापूर युवा शहराध्यक्ष संतोष कांबळे, यांची प्रमुख उपस्थित होती.


 कार्यक्रमाचे आयोजन रिपब्लिकन युवा सेना सोलापूर जिल्हाध्यक्ष सर्पमित्र भीमसेन लोकरे यांनी केले.सुत्रसंचालन अमोल होरशीळ औरंगाबाद यांनी केले, तर हा कार्यक्रम सोहळा यशस्वी करण्यासाठी सुजात वाहुरवाघ अकोला, विक्रम क्षीरसागर, सुरज गायकवाड सोलापूर यांनी बहूपरिश्रम घेतले.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️