आपल्याकडे असलेला बंद किंवा तुटलेल्या फोनवरही मिळणार आता 2000 रुपये..! ‘जिओ’ची भन्नाट ऑफर

 


मोबाईल युजर्ससाठी महत्वाची बातमी आहे. आपण बरेचदा फोन बंद पडल्यास किंवा फुटल्यास त्यावर खर्च न करता, नवीन फोन घेतो.. बंद पडलेले फोन ‘एक्ससेंज’ही करता येत नाही. कोणत्याच वापराच्या नसल्याने असे फोन घरात पडून राहतात व नंतर कचराकुंडीत फेकून दिले जातात..[ads id="ads1"] 

असे बंद पडलेल्या अथवा फुटलेल्या फोनच्या बदल्यात आता तुम्हाला 2000 रुपये मिळणार असल्याचं सांगितलं, तर अनेकाचा विश्वास बसणार नाही. पण हे खरंय.. ‘रिलायन्स जिओ’कडून अशी खास ऑफर देण्यात आलीय. या योजनेनुसार, तुमचा बंद पडलेला जुना मोबाईलही 2000 रुपयांची कमाई करुन देऊ शकतो. कशी ते जाणून घेऊ या..!

जिओ’ची खास ऑफर…

‘रिलायन्स जिओ’च्या या खास ऑफरचा लाभ ‘जिओ फोन नेक्स्ट’ या 4G स्मार्टफोनवर मिळणार आहे. कंपनीने ‘जिओ फोन नेक्स्ट’वर खास एक्सचेंज ऑफर सादर केली आहे. या योजनेनुसार, ‘जिओ फोन नेक्स्ट’ (Jio Phone Next) खरेदी करताना, तुम्ही तुमचा जुना बंद पडलेला मोबाइल दिल्यास, त्या बदल्यात थेट 2000 रुपयांची सूट दिली जाणार आहे.[ads id="ads2"] 

ग्राहकांना आपल्या घरात बंद पडलेल्या, तुटलेला जुना स्मार्टफोन घेऊन यावे लागणार आहे. त्यानंतर ‘रिलायन्स जिओ’ कंपनीच्या पॉलिसीनुसार ‘जिओ फोन नेक्स्ट’ या नवीन स्मार्टफोनवर 2000 रुपयांचा फायदा दिला जाणार आहे. विशेष म्हणजे, कोणत्याही कंपनीचा कोणताही मोबईल तुम्ही एक्सचेंज करुन या ऑफरचा लाभ घेऊ शकता..

हेही वाचा :- स्टेट बँक ऑफ इंडिया देत आहे "या" विद्यार्थ्यांना 15 हजार रुपयांची शिष्यवृत्ती

हेही वाचा :- गट नंबर टाकून 1880 सालापासूनचे जमिनीचे नकाशे, सातबारा उतारा, फेरफार नोंदी पहा थेट आपल्या मोबाईल वर

हेही वाचा :- Pm Kisan Scheme च्या  हप्त्याचे 2000 हजार रुपये कोणा - कोणाला मिळतील यादीत नाव आहे की नाही ? येथे क्लिक करून यादी पहा

हेही वाचा : - Majhi Kanya Bhagyashree Scheme : एक मुलगी असेल तर मिळणार ५० हजार रुपये असा करा अर्ज

हेही वाचा :- अटल पेंशन योजनेतंर्गत मिळणार 5000 हजार रुपये महिना

‘जिओ फोन नेक्स्ट’बाबत…

‘रिलायन्स जिओ’ व ‘गुगल’ यांनी एकत्र येऊन हा 4G स्मार्टफोन तयार केला आहे. भारतातील हा सर्वात स्वस्त 4G स्मार्टफोन असल्याचा दावा ‘जिओ’कडून करण्यात येत होता. मात्र, ‘जिओ’ने हा स्मार्टफोन 6499 रुपये किमतीत लाँच केला होता. त्यामुळे ग्राहकांचा अपेक्षाभंग झाला होता. मात्र, कंपनीने त्यावर 2000 रुपयांची खास सवलत जाहीर केल्याने, फक्त 4999 रुपयांना हा स्मार्टफोन ग्राहकांना खरेदी करता येणार आहे.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️