काय आहे पात्रता?
योजनेचा लाभ घेण्याकरिता अर्जदार हा वैयक्तिक साक्षर असावा, स्वत:ची शेती असल्यास प्राधान्य. वय १८ वर्षापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. केंद्र चालक प्रगतशील मधपाळामध्ये संस्था किंवा व्यक्ती अर्ज सादर करू शकतात. वैयक्तिक केंद्र चालक (प्रगतशील मधपाळ) असावा. त्यांची शैक्षणिक पात्रता किमान १० वी पास, वय वर्ष २१ पेक्षा जास्त असावे. त्या व्यक्तीच्या नावे अथवा त्या व्यक्तीच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या नावे किमान एक एकर शेतजमीन किंवा भाडे तत्त्वावर घेतलेली शेतजमीन लाभार्थीकडे मधमाशापालन प्रजनन व मध उत्पादन बाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता व सुविधा असावी.[ads id="ads2"]
संस्था नोंदणीकृत हवी
‘केंद्र चालक संस्था’साठी पात्रतामध्ये संस्था नोंदणीकृत असावी, संस्थेच्या नावे मालकीची किंवा १० वर्षासाठी भाडे तत्त्वावर किमान एक एकर शेतजमीन, संस्थेच्या नावे अथवा भाडे तत्त्वावर घेतलेली किमान १ हजार चौरस फूट सुयोग्य इमारत असावी. संस्थेकडे मधमाशापालन, प्रजनन व मध उत्पादना बाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता असलेले सेवक असावेत.
याठिकाणी साधावा संपर्क
लाभार्थी निवड प्रक्रियेनंतर प्रशिक्षणापूर्वी मध व्यवसाय सुरू करण्यासंबंधी मंडळास बंध पत्र लिहून देणे अनिवार्य राहील. ५० टक्के स्वगुंतवणूक ही निवड झाल्यानंतर प्रशिक्षण चालू होण्याआगोदर भरावी लागेल. मंडळाने निश्चित केलेल्या ठिकाणी प्रशिक्षण घेणे अनिवार्य राहील. अधिक माहितीसाठी जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, द्वारा जिल्हा केंद्र, आय.टी.आय शेजारी जळगाव येथे संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी यांनी केले आहे.