या स्पर्धेत महिलांमधून प्रथम क्रमांक कु. प्राचल विनोद कोळी, द्वितीय क्रमांक कु. साक्षी विजय कोळी तृतीय क्रमांक कु. समीक्षा रामकृष्ण सपकाळे तसेच पुरुष गटा मधून प्रथम क्रमांक मालखेडे सुदेश दिलीप, द्वितीय क्रमांक योगेश सुनिल कोळी तृतीय क्रमांक देवेंद्र लीलाधर तायडे यांनी पटकावला. महाविद्यालयातील विद्यार्थी विकास विभाग व क्रीडा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन करण्यात आले होते. या सर्व विजेत्यांना सम्मान चिन्ह (ट्रॉफी) देऊन गौरविण्यात आले.
स्पर्धेचे आयोजनासाठी ऐनपूर परिसर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. भागवतभाऊ पाटील, चेअरमन श्री. श्रीराम नारायण पाटील, सचिव श्री. संजय वामन पाटील, संस्थेचे सर्व पदाधिकारी व ऐनपूर येथील प्रार्थमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सिद्धेश रवींद्र पाटील व डॉ. विवेक अरुण पाटील तसेच आरोग्य केंद्राचे कर्मचारी उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने तसेच महाविद्यालयातील क्रीडा समिती सदस्य आणि क्रीडा संचालक डॉ. एस. एन. झोपे, डॉ के जी कोल्हे, डॉ आर व्ही भोळे, डॉ एस एन वैष्णव, डॉ जे पी नेहेते, डॉ डी बी पाटील,प्रा एस आर इंगळे, प्रा साईनाथ उम्रीवाड,प्रा विनोद रामटेके, डॉ पी आर गवळी,पुजा कुमावत, नरेंद्र मुळे, प्रदिप तायडे, अक्षय महाजन,काजल महाजन, अंकुर पाटील, ज्ञानेश्वर कोळी, आणि महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कठोर परिश्रम घेतले.