स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालय ऐनपूर येथे मॅरेथॉन स्पर्धा संपन्न


निंबोल प्रतिनिधी (विनोद कोळी) सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालय ऐनपूर येथे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या विद्यार्थी विकास विभाग आणि महाविद्यालयातील क्रीडा व विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव वर्षानिमित्त आणि मेजर ध्यानचंद याच्या जयंती निम्मिताने २९ ऑगस्ट रोजी सकाळी ०८.०० वाजता मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली. या मॅरेथॉन स्पर्धेत २४५ पुरुष आणि महिलांनी सहभाग नोंदवला. [ads id="ads1"] 
  यात पुरशांसाठी ५ कि.मी. आणि महिलांसाठी ३ कि. मी. एवढ्या अंतराचे नियोजन होते. मॅरेथॉन स्पर्धेचे उद्घाटन ऐनपूर परिसर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. भागवतभाऊ पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख वक्ते म्हणून स्पर्धेसाठी लागणारे टी-शर्ट चे प्रायोजक वैष्णवी फर्टिलायझर चे संचालक श्री. राहुल पाटील हे होते. या स्पर्धेसाठी ऐनपूर परिसर शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन श्री. श्रीराम नारायण पाटील, सचिव श्री. संजय वामन पाटील, आणि संस्थेचे सर्व पदाधिकारी स्पर्धकांचा उत्साह वाढविण्यासाठी उपस्थित होते. [ads id="ads2"] 

या स्पर्धेत महिलांमधून प्रथम क्रमांक कु. प्राचल विनोद कोळी, द्वितीय क्रमांक कु. साक्षी विजय कोळी तृतीय क्रमांक कु. समीक्षा रामकृष्ण सपकाळे तसेच पुरुष गटा मधून प्रथम क्रमांक मालखेडे सुदेश दिलीप, द्वितीय क्रमांक योगेश सुनिल कोळी तृतीय क्रमांक देवेंद्र लीलाधर तायडे यांनी पटकावला. महाविद्यालयातील विद्यार्थी विकास विभाग व क्रीडा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन करण्यात आले होते. या सर्व विजेत्यांना सम्मान चिन्ह (ट्रॉफी) देऊन गौरविण्यात आले. 

स्पर्धेचे आयोजनासाठी ऐनपूर परिसर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. भागवतभाऊ पाटील, चेअरमन श्री. श्रीराम नारायण पाटील, सचिव श्री. संजय वामन पाटील, संस्थेचे सर्व पदाधिकारी व ऐनपूर येथील प्रार्थमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सिद्धेश रवींद्र पाटील व डॉ. विवेक अरुण पाटील तसेच आरोग्य केंद्राचे कर्मचारी उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने तसेच महाविद्यालयातील क्रीडा समिती सदस्य आणि क्रीडा संचालक डॉ. एस. एन. झोपे, डॉ के जी कोल्हे, डॉ आर व्ही भोळे, डॉ एस एन वैष्णव, डॉ जे पी नेहेते, डॉ डी बी पाटील,प्रा एस आर इंगळे, प्रा साईनाथ उम्रीवाड,प्रा विनोद रामटेके, डॉ पी आर गवळी,पुजा कुमावत, नरेंद्र मुळे, प्रदिप तायडे, अक्षय महाजन,काजल महाजन, अंकुर पाटील, ज्ञानेश्वर कोळी, आणि महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कठोर परिश्रम घेतले.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️