महावितरणाच्या (Mahavitaran) वतीने कार्यकारी अभियंता गोरक्षनाथ सपकाळे यांच्या आदेशानुसार व उपकार्यकारी अभियंता राजेश नेमाडे यांचे मार्गदर्शनाखाली पथक स्थापन करून ज्या ज्या भागात विजेची हानी होत आहे अशा ठिकाणी वीज चोरांविरोधात मोहीम उघडण्यात आली आहे.[ads id="ads2"]
या मोहिमेत ५० युनिट पेक्षा कमी वापर असलेले एकूण २३२ ग्राहकांच्या मिटरची कसून तपासणी करण्यात आली असून फेरफार असलेले सावदा शहर ०५, सिंगनूर १०, वाघोदा बुद्रुक ०६, चिनावल ०६, निंभोरा ०४, खिरोदा ०४, गाते ०२, कोचुर ०३, बलवाडी ०१ असे एकूण ३० मीटर जप्त करण्यात आले.
हेही वाचा :- विहीरीत महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ ; जळगाव जिल्ह्यातली घटना
हेही वाचा :- मधमाशी पालन व्यवसायाकरिता मिळणार ५० टक्के निधी; जाणून घ्या नेमकी योजना काय?
व सदरील ग्राहकांची वीज जोडणी कापण्यात आली आहे. घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक व सर्व प्रकारच्या वर्गवारीतील नागरिकांनी कोणत्याही प्रकारची वीज चोरी करू नये; अन्यथा संबंधितांवर वीज कायद्यानुसार दंडात्मक कार्यवाही करण्यात येणार असल्याचे आवाहन उप कार्यकारी अभियंता राजेश नेमाडे यांनी केले आहे.