बनावट देशी दारू तयार करुन विकणाऱ्या इसमावर अमळनेर पोलीसांची धडक कार्यवाही


अमळनेर (अमोल बैसाने)

बनावट देशी दारुचा साठा जप्त मा. पोलीस अधिक्षक सो. डॉ. प्रविण मुंढे सो. यांनी  पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्यावर कारवाया करण्याचे आदेश दिले होते. त्यादरम्यान पो.नि. श्री. जयपाल हिरे यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, अमळनेर पोलीस स्टेशन हद्दीत अवैधरित्या बनावट दारू तयार करण्याचा चालता फिरता कारखाना काही इसमाकडून चालवला जात असून सदरचे इसम हे तीन ते चार तासात स्पिरीट पासुन बनावट दारू तयार करत असल्याची पक्की खबर मिळाल्यावरुन दि.१९/०८/२०२२ रोजी खालील नमुद पथकतील अधिकारी व अंमलदार असे जानवे ता. अमळनेर शिवारात गेले असता तेथे दोन इसम हे २,४९,१२०/- रु. कि.च्या ४२ बॉक्स प्रत्येक बॉक्स मध्ये ४८ बाटल्या अश्या एकुण २०१६ बनावट दारुच्या बाटल्या व बनावट दारू बनविणे करीता लागणारे साहीत्यासह मिळुन आले आहेत[ads id="ads1"]   व याबाबत अमळनेर पोलीस स्टेशनला गु.र.न. ३७३/२०२२ भा.द.वि. कलम ३२८,३४ म. दारुबंदी अधि.१९४९ चे कलम ६५ (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे व आरोपी नाम- १) दिनेश प्रभाकर भावसार रा. पाटील गढी, भालेराव नगर, अमळनेर व आरोपी २) भटु वसंत पाटील रा.जानवे ता. अमळनेर (शेतमालक) अशांना गुन्ह्यांकामी अटक केली आहे. सदर गुन्ह्यांचा तपास पोनि. श्री. गंभीर शिंदे हे करीत आहेत.[ads id="ads2"] 

सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. प्रविण मुंढे सो, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री. रमेश चोपडे सो., मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. राकेश जाधव सो. यांच्या सूचना व मार्गदर्शनाने पो.नि. श्री. जयपाल हिरे पोउनि श्री गंभीर शिंदे, पोना/ कैलास शिंदे, पोना/ हितेश चिचोरे, पोना / योगेश महाजन, पोकों/ भुषण पाटील व पाका सुनिल पाटील अश्यांच्या पथकाने केली आहे.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️