भडगाव :- भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव संपूर्ण देशात साजरा होत असल्याने स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास जनमानसापर्यंत पोहचत आहे , रोमांचित करणारे प्रसंग सांगितले जात आहेत या प्रयत्नातून देशवासियांनमध्ये राष्ट्रीय चेतना निर्माण होऊन देशाला अधिक समृद्ध करण्यात यश येईल असे विचार प्रसिद्ध विचारवंत जयसिंग वाघ यांनी व्यक्त केले.[ads id="ads1"]
भडगाव येथील रजनीताई देशमुख महाविद्यालयात स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त सलग दोन महिने आयोजित विविध कार्यक्रमांचे उदघाटन वाघ यांच्या हस्ते करण्यात आले तेंव्हा लढा स्वातंत्र्याचा व पंचात्तर वर्षे स्वातंत्र्याचे या विषयावर वाघ यांनी आपले विचार मांडले.[ads id="ads2"]
जयसिंग वाघ यांनी पुढं सांगितलेकी भारतात तब्बल १८६ वर्षे हा लढा चालला , आदिवासी नेत्यांनी हा लढा सुरू केला पुढं महात्मा गांधी यांनी त्याची धुरा आपल्या खांद्यावर घेतली आणि शांतता व अहिंसा या तत्वावर तो यशस्वी केला या तत्वावर यशवी झालेला जगातला हा एकमेव लढा आहे कारण जगात जे लढे लढले गेले त्या प्रत्येक लढ्यात मोठ्या प्रमाणात शस्त्र वापरून रक्तपात झाला आहे , ढाल , तलवार या पेक्षा शांतता , अहिंसा ही शस्त्रे अधिक प्रभावी आहेत हे आम्ही सिद्ध करू शकले .
प्राचार्य डॉ एन. एन. गायकवाड यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात दोन महिन्यात आयोजित केलेल्या कार्यक्रमांची विस्तृत माहिती दिली व स्वातंत्र्यच्या लढ्याने आम्हाला आत्मभान दिले , राष्ट्र व राष्ट्राभिमान दिला , गुलामीच्या जोखडातून मुक्त केले , आम्ही राष्ट्राच्या उभारणी करता अधिक प्रयत्नशील होऊया .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा गुणवंत अहिरराव तर आभार प्रदर्शन प्रा सुनिल कोळी यांनी केले . मंचावर जयसिंग वाघ , प्राचार्य डॉ एन एन गायकवाड , उपप्राचार्य प्रा एस आर पाटील , समन्वयक डॉ संजय भैसे , डॉ चित्रा पाटील , शिक्षक पालक संघाचे अध्यक्ष इम्रान अली सय्यद होते .
कार्यक्रमास प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने हजर होते , कार्यक्रमाची सुरवात दिलप्रज्वलनाने तर समारोप राष्ट्रगीताने झाला