विहीरीत महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ ; जळगाव जिल्ह्यातली घटना

 जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील चिंचपुर गावानजीक असलेल्या एका शेत शिवारातील विहीरीत एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात चर्चेला उधान आले आहे. सदर महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असून हा अपघात आहे की घातपात हे अद्याप पुढे आलेले नाही.[ads id="ads2"]  

  आज दिनांक २८ ऑगस्ट दुपारी बारा वाजेच्या सुमारास या मृतदेहाची माहिती परिसरातील नागरिकांना समजताच त्यांनी घटनास्थळाकडे धाव घेत गर्दी केली. सदर घटनेची माहिती धरणगाव पोलिसांना मिळताच पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. 

हेही वाचा :- मधमाशी पालन व्यवसायाकरिता मिळणार ५० टक्के निधी; जाणून घ्या नेमकी योजना काय?

हेही वाचा : सावद्यात महावितरणाच्या धडक कारवाईत विविध कलमान्वये ४१ वीज चोरांविरुद्ध दंडात्मक कारवाई

पोलिसांनी पुढील कायदेशीर प्रक्रियेला सुरुवात केली. तपासात हा प्रकार अपघात आहे की घातपात हे समजणार आहे.


जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️