दुःखद : जम्मू आणि काश्मीरमध्ये सैन्य दलाची बस 500 फूट खोल दरीत कोसळली, 6 जवान शहीद

 


जम्मू आणि काश्मीरमध्ये एक भीषण अपघात झाला आहे. ITBP जवानांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळली. या दुर्घटनेत 6 जवान शहीद झाले आहेत, तर 32 जण जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे.बस खड्ड्यात पडल्यानंतर परिसरात बचावकार्य सुरू करण्यात आले असून लष्कराचे जवान जखमींच्या बचावकार्यात गुंतले आहेत.[ads id="ads1"] अमरनाथ यात्रा ड्युटी संपवून जवान परतत होते

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमरनाथ यात्रेची ड्युटी पूर्ण केलेल्या ITBP जवानांना घेऊन बस चंदनवाडीहून परत येत होती. हा अपघात चंदनवाडी आणि पहलगामच्या दरम्यान असलेल्या फ्रिसलान भागात झाला. बस सुमारे 500 फूट खोल दरीत कोसळली. बसचे ब्रेक निकामी झाल्यामुळे अपघात झाल्याची शक्यता वर्तवली जाते.[ads id="ads2"] 

या बसमधील 38 जणांमध्ये 37 जण आयटीबीपीचे सैनिक तर दोघे जम्मू काश्मीर पोलीस होते. या दुर्घटनेत एकूण 6 जवान शहीद झाल्याची माहिती आहे. तर 32 जवान जखमी झाले असून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्याचं काम सुरु आहे. या अपघातामध्ये बसचा अक्षरशः चुराडा झाला. त्यावरुन हा अपघात किती भीषण होता, याची निव्वळ कल्पनाही अंगावर काटा आणणारी आहे.

जाहिरात


Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️