महामार्गावर मोठी अप्रिय घटना घडण्याची दाट शक्यता...
वाहनधारकांमध्ये तीव्र संताप
यावल (सुरेश पाटील) पहूर येथून औरंगाबादकडे जाताना महामार्गाची दयनीय अवस्था झालेली आहे याकडे संपूर्ण शासकीय यंत्रणेचे राजकीय नेत्यांचे विविध संघटनांचे समाजसेवकांचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये प्रवासी वाहनधारकांमध्ये मोठा तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.[ads id="ads2"]
भुसावळ जामनेर मार्गे तसेच जळगाव पहूर मार्गे औरंगाबाद जाताना पहूर गावाच्या पुढे अनेक ठिकाणी महामार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे या महामार्गावर अनेक ठिकाणी दुचाकी चार चाकी वाहने चालविणे अशक्य आणि जिकरीचे झाले आहे,या महामार्गाचे सिमेंट काँक्रीटचे बांधकाम अत्यंत कासव गतीने सुरू आहे,महामार्गावरील प्रवासी वाहनधारक आणि इतर अवजड़ वाहतूकदारांच्या सुविधांकडे संबंधित कॉन्ट्रॅक्टर यांचे दुर्लक्ष होत असून महामार्गावर एखाद्या वेळेस मोठी अप्रिय घटना घडण्याचे दाट शक्यता निर्माण झाली आहे. [ads id="ads1"]
तसेच अनेक वेळेला वाहतूक ट्राफिक जाम होत असते इत्यादी बाबींकडे तसेच ठेकेदाराच्या वेळ काढू भूमिकेकडे आणि वाहतुकीच्या दृष्टिकोनातून बेजबाबदारपणे काम करीत असल्याने महामार्गावरील झालेल्या दयनीय अवस्थेकडे औरंगाबाद महामार्गावर 'जा' 'ये' करणारे सर्व अधिकारी,कर्मचारी,आमदार खासदार,मंत्री,लोकप्रतिनिधी, पदाधिकारी,कार्यकर्ते,विविध संघटना,समाजसेवकांचे सुद्धा दुर्लक्ष होत असून सर्व गप्प आहेत कोणी काहीही बोलायला तयार नाहीत.यामुळे सर्व स्तरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून संबंधित यंत्रणेला सर्व स्तरातून बददुवा दिली जात असून याचे परिणाम शासकीय यंत्रणेला पर्यायी ठेकेदाराला भोगावे लागतील असे औरंगाबाद खंडपीठ कार्यक्षेत्रात बोलले जात आहे.
संबंधित सर्व शासकीय यंत्रणेने लोकप्रतिनिधींनी महामार्गावर ज्या ठिकाणी वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे अशा ठिकाणची दुरुस्ती तात्काळ संबंधित ठेकेदाराकडून करून घ्यावी ठेकेदाराकडे कामावर सर्व मशिनरी उपलब्ध असताना ठेकेदार वाहनधारकांच्या सुविधांकडे दुर्लक्ष का करीत आहे याचे सुद्धा आत्मचिंतन लोकप्रतिनिधी आणि स्वतः ठेकेदाराने करायला पाहिजे असे सुद्धा सर्व स्तरात बोलले जात आहे.