महाराष्ट्रातील १० राजकीय पक्षांच्या मान्यता रद्द; केंद्रीय निवडणूक आयोगाची मोठी कारवाई

 


महाराष्ट्र  राज्यात शिवसेना विरुद्ध शिंदे गटामध्ये (Shivsena Vs Shinde Group) पक्ष आणि पक्षाचे चिन्ह धनुष्यबाण (Bow-Arrow) आपल्याकडेच रहावे यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे (Election Commission Of India) धाव घेतली आहे. हा वाद आता सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) असतानाचा केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील १० राजकीय पक्षांची मान्यता रद्द (Cancellation Of Recognition Of Political Parties) केली आहे. तसेच, त्यांच्या पक्षाचे निवडणूक चिन्हही गोठवले आहे.[ads id="ads1"] 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाने धनुष्यबाण हे चिन्ह आपल्या गटाला द्यावे अशी मागणी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली आहे. तर, शिवसेनेने आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय प्रलंबित असताना पक्ष आणि निवडणूक चिन्ह याबाबतचा निर्णय निवडणूक अयोग्य घेऊ शकत नाही अशी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केली आहे. शिवसेना आणि शिंदे गट यांच्यात पक्ष आणि निवडणूक चिन्ह कुणाचे यावरून रस्सीखेच सुरु असतानाच निवडणूक आयोगाने देशातील एकूण १११ राजकीय पक्षांची मान्यता रद्द केली आहे. यात महाराष्ट्रातील १० पक्षांचा समावेश आहे.[ads id="ads2"] 

विविध राज्यातील पक्षांवर झालेली कारवाई

दिल्ली ३३, उत्तर प्रदेश १०, आसाम ९, जम्मू काश्मीर ८, बिहार ६, आंध्र प्रदेश ५, ओरिसा ३, गुजरात ३, केरळ ३, तामिळनाडू ३, मध्य प्रदेश ३, पश्चिम बंगाल २, मिझोराम २, कर्नाटक २, हरयाणा २, पंजाब १, हिमाचल प्रदेश १, राजस्थान १, झारखंड १, मेघालय १, उतराखंड १

हेही वाचा :  रावेर पंचायत समितीतील शौचालय प्रकरणातील पुन्हा ६ जणांना अटक ; आता पर्यंत आरोपींची संख्या पोहचली १८ वर 

हेही वाचा : महाराष्ट्रातील १० राजकीय पक्षांच्या मान्यता रद्द; केंद्रीय निवडणूक आयोगाची मोठी कारवाई; कोणकोणते पक्ष आहेत ?  वाचा सविस्तर

हेही वाचा : घटस्फोट झालेल्या तरुणीने भुसावळ येथील तापी नदीत उडी घेत संपवली जीवनयात्रा

हेही वाचा :कार्यकारी अभियंता,उपविभागीय अभियंता आणि ठेकेदाराची मिलीभगत ?जळगाव जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष

हे आहेत महाराष्ट्रातील १० पक्ष

भारतीय आवाज पार्टी - मुंबई

वॉर वेतरणा पार्टी - मुंबई

जनादेश पक्ष - मुंबई

न्युज काँग्रेस - मुंबई

पीपल्स पॉवर पार्टी - मुंबई

राष्ट्रीय लोक जागृती पार्टी - ठाणे

शेतकरी विचार दल - अहमदनगर

भारतीय राष्ट्रीय स्वदेशी काँग्रेस पक्ष - पुणे

विदर्भ विकास पार्टी - नागपूर

विदर्भ राज्य पार्टी - नागपूर

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️