विजेचा धक्का लागल्याने २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू ;जळगाव जिल्ह्यातील घटना

 


एका खासगी रुग्णालयात कंपाउंडर असलेल्या २४ वर्षीय तरुणाला विजेचा धक्का लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना अमळनेरात घडली.याबाबत अमळनेर पोलिसांत (Amalner Police) अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.[ads id="ads1"] 

रूपेश दिलीप देवरे (वय २४) असे मृत तरुणाचे नाव आहे. आर. के. नगरमधील रहिवासी रूपेश देवरे हा तरुण डॉ. अंजली चव्हाण यांच्या रुग्णालयात रात्रपाळीला कंपाउंडर म्हणून काम करत होता. रात्री वीज गेल्याने तो जनरेटर सुरु करायला गेला. यावेळी त्याला विजेचा जबर धक्का बसला. त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, परिस्थिती गंभीर असल्याने देवरे याला तातडीने Amalner ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले.[ads id="ads2"] 

यावेळी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी अमरनाथ मिस्तरी यांच्या माहितीवरुन अमळनेर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास हेड कॉन्स्टेबल सुनील हटकर करत आहेत. दरम्यान, रुपेशच्या घरची परिस्थिती सर्वसाधारण आहे. घरात वडील व मोठा भाऊ मिस्तरी व्यवसाय करून घराची जबाबदारी सांभाळतात. तर रूपेश हा त्यांना मदत करत होता. त्याच्या पश्चात आई, वडिल, मोठा भाऊ, बहीण असा परिवार आहे.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️