चाळीसगांव (सुवर्ण दिप वृत्तसेवा)चाळीसगाव तालुक्यातील मांदुर्णे गावात राष्ट्रीय डेंग्यू प्रतिरोध महिना जुलै एक दिवस एक कार्यक्रमांतर्गत किटकजन्य तसेच जलजन्य आजाराविषयी मांदुर्णे, नांद्रे, काकडणे गावात जनजागृती करण्यात आली.[ads id="ads2"]
जिल्हा हिवताप आधिकारी डॉ.डी.के.लांडे. यांचा आदेशाने तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र शिरसगाव येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.रोशन गायकवाड, डॉ.सुजित भोसले, डॉ.संतोष सांगळे तसेच आरोग्य विस्तार अधिकारी प्रदीप सोनवणे, आरोग्य सहायक हमीद पठाण, ममराज राठोड, संजय निकुंभ, सुरेंद्र शितोळे , M.S.V.P. राठोड नाना यांचा मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय डेंग्यू प्रतिरोध महिना जुले २०२२ एक दिवस एक कार्यक्रम घेऊन साजरा करण्यात येत आहे.[ads id="ads1"]
कंटेनेर सर्वेक्षण साचलेल्या डबक्यात क्रूड ऑइल टाकणे, आरोग्यविषयक म्हणी लिहणे, डास उत्पत्ती स्थानकात गप्पी मासे सोडणे, जलद ताप सर्वेक्षण करणे, प्रदर्शनात आरोग्यविषयी माहिती देणे, गावात रॅली काढणे इत्यादी कार्यक्रम घेऊन जनतेमध्ये जनजागृती करण्यात येत आहे.
याकामी मांदुर्णे येथील आरोग्य सेवक संदिप चौधरी, आरोग्यसेविका ठाकुर सिस्टर, प्रणाली रामटेके व सर्व आशा प्राथमिक आरोग्य केंद्र शिरसगाव येथील सर्व कर्मचारी वृंद यांचे सहकार्य लाभले.