रावेर पंचायत समितीतील शौचालय प्रकरणातील पुन्हा ६ जणांना अटक ; आता पर्यंत आरोपींची संख्या पोहचली १८ वर


रावेर पंचायत समितीतील (Raver Panchayat Samiti) शौचालय प्रकारणात Raver पोलीसांनी अजून सहा जणांना रावेर तालुक्यातील विविध गावांमधून अटक केली आहे. या कारवाईमुळे रावेर तालुक्यात (Raver Taluka)  पुन्हा एकच खळबळ उडाली आहे. आतापर्यंत संशयित आरोपीची संख्या १८ वर पोहचली आहे.अजून काही जण रावेर पोलिसांच्या रडारवर आहे.[ads id="ads1"] 

      याबाबत सविस्तर वृत्त असे की , रावेर पंचायत समितीच्या (Raver Panchayat Samiti) अंतर्गत वैयक्तिक शौचालय घोटाळ्यात कोट्यवधी रूपयांचा भ्रष्टाचार उघडकीस आला आहे. यामध्ये यापुवी १२ जणांना अटक करण्यात आली होती. मंगळवारी २६ जुलै रोजी रात्री उशीरापर्यंत रावेर पोलीसांनी पुन्हा अटकसत्र सुरू केले. [ads id="ads2"] 

  यात नव्याने सहा संशयित आरोपींची भर पडली आहे. यात रावेर तालुक्यातील प्रदीप वेडु धनगर ( बलवाडी ), राहुल जिवन सोनार ( निंभोरा ), अशोक हरी पाटील ( सिंदखेड ), गोपाळ वेडु गुरव ( बलवाडी ), जितेंद्र मंगळु अडगावकर ( गाते ), राहुल मूरलीधर कोळी ( पूरी ) यांना अटक करण्यात आली  आहे. 

हेही वाचा :  रावेर पंचायत समितीतील शौचालय प्रकरणातील पुन्हा ६ जणांना अटक ; आता पर्यंत आरोपींची संख्या पोहचली १८ वर 

हेही वाचा : महाराष्ट्रातील १० राजकीय पक्षांच्या मान्यता रद्द; केंद्रीय निवडणूक आयोगाची मोठी कारवाई; कोणकोणते पक्ष आहेत ?  वाचा सविस्तर

हेही वाचा : घटस्फोट झालेल्या तरुणीने भुसावळ येथील तापी नदीत उडी घेत संपवली जीवनयात्रा

हेही वाचा :कार्यकारी अभियंता,उपविभागीय अभियंता आणि ठेकेदाराची मिलीभगत ?जळगाव जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष

  रावेर पंचायत समितीच्या (Raver Panchayat Samiti)  अंतर्गत वैयक्तिक शौचालय घोटाळा प्रकरणात आतापर्यंत एकुण १८ जणांना अटक करण्यात आली आहे . या कारवाईमुळे रावेर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. अजूनही काही जण पोलीसांच्या रडावर असल्याचे दिसून येत आहे.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️