अतिक्रमण प्रकरणी तालुक्यातील रायपूर येथील सरपंच व उपसरपंचासह ग्रामपंचायत सदस्य अपात्र


 रावेर तालुक्यातील रायपूर (Raipur Taluka Raver) येथील सरपंच, उपसरपंच आणि तीन ग्रामपंचायत सदस्य अशा एकूण पाच जणांना अतिक्रमण भोवले असून त्यांना  जळगाव जिल्हाधिकार्‍यांनी (Jalgaon Collector) अपात्र घोषीत केले आहे.[ads id="ads2"]  

सविस्तर वृत्त असे की,रावेर तालुक्यातील रायपूर  (Raipur Taluka Raver) येथील सरपंच रूपेश युवराज पाटील, उपसरपंच तुकाराम सखाराम तायडे, ग्रामपंचायत सदस्य सौ. रेखाबाई तायडे, सौ. माधुरी चौधरी आणि प्रकाश भिकारी तायडे यांनी रायपूर ग्रामपंचायत हद्दीत अतिक्रमण केल्याची तक्रार रायपूर (Raypur Taluka Raver) येथील मनोहर लक्ष्मण पाटील यांनी केली होती. त्यांना ग्रामसेवकांनी मदत केल्याचा आरोप देखील करण्यात आला होता. या प्रकरणाची जळगाव जिल्हाधिकार्‍यांकडे सुनावणी घेण्यात आली.[ads id="ads1"]  

या सुनावणीच्या नंतर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९च्या कलम १४ (१) (ज-३) अन्वये या पाचही जणांना अपात्र ठरविण्यात येत असल्याचा निर्णय जळगाव जिल्हाधिकारी अभिजीत राऊत (Jalgaon Collector Abhijit Raut)  यांनी दिला आहे. हा निर्णय १९ जुलै रोजी पारीत करण्यात आलेला आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️