बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गावर मोकाट गुरांमुळे आरटीओला सुद्धा अडथळा

 


यावल (सुरेश पाटील) बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गावर यावल बस स्टॅन्ड समोर गुरढोरा रांच्या कळपांमुळे खुद्द आरटीओच्या वाहनाला सुद्धा अडथळा निर्माण झाल्याने शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्या निष्क्रिय कामकाजामुळे शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांनाच म्हणजे आरटीओला सुद्धा महामार्गावर अडथळ्यांना सामोरे जावे लागते याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.[ads id="ads2"]  

          याबाबत सविस्तर माहिती अशी की काल दि.20जुलै2022 रोजी संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास आरटीओ अधिकाऱ्याचे वाहन फैजपूरकडून यावल बस स्टॅन्ड कडे येत असताना यावल एसटी स्टँड समोरच गुरढोरांचा मोठा कळप भर रस्त्यावर म्हणजे बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गावर यावल नगरपालिका हद्दीत उभा असल्याने आरटीओ वाहनालाच मोठा अडथळा निर्माण झाला हे प्रत्यक्ष दर्शनी बघितल्याने आरटीओच्या आणि यावल नगरपालिकेच्या कारभाराबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले गेले.[ads id="ads1"]  

         महामार्गावर किंवा इतर रस्त्यावर आरटीओचे वाहन दुरून पाहता बरोबर इतर वाहनधारकांची तारांबळ उडत असते काही अवैध प्रवासी वाहनधारक आणि इतर काही जण वाहतूक करणारे वाहन लांब अंतरावरच थांबून जातात. वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या वाहन चालकांवर आरटीओ ज्याप्रमाणे कारवाई करतात त्याप्रमाणे सर्व ठिकाणी ठराविक वेळेला भर रस्त्यावर जे गुरढोर/ गाई म्हशी इत्यादी प्राणी चालत असतात किंवा थांबलेले असतात त्यावेळेला प्रत्येक वाहनधारक म्हणतात रस्त्यात आरटीओ उभे आहेत अशा अनधिकृत गुराढोरांवर आरटीओ काय कारवाई करणार?असा प्रश्न उपस्थित होत असला तरी आरटीओ किंवा संबंधित ग्रामपंचायत,नगरपालिका यांनी गुरढोरं मालकांना किंवा ढोरकऱ्यांना आधी सूचना देण्याची कायदेशीर कार्यवाही करून नंतर दंडात्मक कारवाई करावी असे सुद्धा आता बोलले जात आहे.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️