Dharangaon : महात्मा फुले हायस्कूल येथे मुन्नादेवी अँड मंगलादेवी फाउंडेशनतर्फे शैक्षणिक साहित्य वाटप......


🔹शाळेतल्या गरजू विद्यार्थ्यांना १० गणवेश देणार - जीवनआप्पा बयस

धरणगाव प्रतिनिधी (पी.डी. पाटील सर) मुन्नादेवी अँड मंगलादेवी फाऊंडेशन धरणगाव च्या वतीने सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे " एक कदम शिक्षा की ओर" ज्योती स्मृती उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वही - पेन चे वाटप करण्यात आले.[ads id="ads2"]  

         या स्तुत्य उपक्रमाचे प्रास्ताविक शाळेतील आदर्श शिक्षक पी.डी.पाटील यांनी केले. प्रास्ताविकात पाटील यांनी " शिक्षा से जीवन की ज्योत उजागर होती है I " हा संस्थेचा सामाजिक संदेश आहे. मुन्नादेवी अँड मंगलादेवी व फाउंडेशनचे सामाजिक कार्याचे विविध उदाहरणे देऊन त्यांच्या कार्याची माहिती विशद केली. [ads id="ads1"]  

          कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक जे.एस.पवार होते. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी फाऊंडेशनचे संस्थापक जीवन आप्पा बयस, तेजंद्र चंदेल, गोविंद पुरभे, सचिव मुकेश बयस, दुर्गेश बयस, धीरेंद्र पुरभे, प्रा.जितेंद्र बयस, मोहनीश चंदेल, हर्षल बयस मान्यवर उपस्थित होते.

          सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले व विद्येची खरे देवता सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सर्व मान्यवरांच्या हस्ते शाळेतील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

          प्रा. जितेंद्र बयस यांनी संस्थेचे सामाजिक कार्य विशद केले. पी.डी.पाटील यांनी प्रास्ताविकात गरजू विद्यार्थ्यांना शालेय गणवेश संदर्भात मागणी केली असता जीवनआप्पांनी तात्काळ १० ड्रेस देणार असे आश्वासन दिले.

        कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक जे.एस. पवार यांनी फाउंडेशन नेहमी आमच्या शाळेला शैक्षणिक साहित्य, वहया -पेन, कपडे, सायकल अशा स्वरूपात मदत करत असते. संस्थेचे आम्ही ऋणात राहू असेच प्रेम आमच्या शाळेवर असावे. असे प्रतिपादन केले.

           या सामाजिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख एस.एन.कोळी तर आभार क्रीडा शिक्षक एच.डी.माळी यांनी केले.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️