राजकीय प्रभावामुळे ठेकेदारकडून प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे काम बेकायदा,निकृष्ट प्रतीचे ; अधिकाऱ्यांनी 250 नागरिकांची तक्रार टाकली कचरापेटीत


 
यावल दि.23(सुरेश पाटील)

यावल तालुक्यातील म्हैसवाडी येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे 1 कोटी 21लाख 28 हजार रुपयांचे निकृष्ट बांधकाम राजकीय प्रभावाखाली असलेला ठेकेदार गजानन मधुकर सोनार यांनी दुसऱ्याच गट क्र.असलेल्या जागेवर प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे काम आपल्या सोयीनुसार बेकायदा आणि मंजूर प्लॅन,इस्टिमेट प्रमाणे न करता तसेच मुदत संपल्यावर सुद्धा काम सुरू असल्याने या कामाची सखोल चौकशी करून कार्यवाही करण्यासाठी म्हैसवाडी येथील एकूण 267 पुरुष महिला कार्यकर्त्यांनी लेखी तक्रार म्हैसवाडी ग्रामपंचायत सह संपूर्ण अधिकाऱ्यांकडे केली असली तरी ग्रामस्थांची तक्रार संबंधित अधिकाऱ्यांनी कचरा कुंडीत टाकल्याचे संपूर्ण यावल तालुक्यात राजकारणात, बांधकाम क्षेत्रात बोलले जात आहे.[ads id="ads2"]  

         याबाबत सविस्तर माहिती अशी की म्हैसवाडी येथील ग्रामस्थांनी ग्रामपंचायत म्हैसवाडी यांच्याकडे तसेच जिल्हाधिकारी जळगाव,जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद वैद्यकीय अधिकारी,जिल्हा परिषद बांधकाम विभाग मुख्य अभियंता, रावेर येथील जिल्हा परिषद उपविभागीय बांधकाम अभियंता,आमदार शिरीषदादा चौधरी,खासदार रक्षाताई खडसे यांच्याकडे दिलेल्या लेखी निवेदनात म्हटले आहे की, म्हैसवाडी प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे सुरू असलेले बांधकाम 7/12 उतारा प्रमाणे हे गट क्र.2 मध्ये सुरू आहे,गट क्र.2च्या सातबारा नोंदीवर प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे नावाने कुठल्याही प्रकारची नोंद आढळून येत नाही,तसेच7/12 उताऱ्याप्रमाणे गट क्र.1मध्ये प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे नावाने जागा कायदेशीर नोंदणीकृत आहे,प्रत्यक्षात मात्र प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे काम हे गट क्र.2 मध्ये सुरू आहे ही बाब कायदेशीर रित्या मोठी गंभीर आहे.[ads id="ads1"]  

       7/12 उताऱ्याप्रमाणे गट क्र.2मध्ये सुरू असलेले काम हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे तसेच मंजूर प्लॅन इस्टिमेट प्रमाणे न करता बांधकामात माती,दगड,गोटे मिश्रित वाळू,कच्च्या विटा या क्युरींग करतानाचे वेळेसच धुतल्या जात आहे,श्री कंपनीचे आयएसआय मार्क नसलेले सिमेंट तसेच अतिशय तुटलेले फुटलेले सेंट्रींग निकृष्ट दर्जाचे वापरले जात आहे भरावासाठी मुरूमाऐवजी पिवळी माती वापरलेली असून मातीवर धम्मस न करता पीसीसी टाकलेली आहे.

         तसेच या प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात येण्यासाठी पावसाळ्यात सोयीचा अधिकृतपणे रस्ता नाही तो अतिशय खराब शेती रस्ता आहे नाल्यामुळे संपर्क तुटतो तसेच जेथे बांधकाम सुरू आहे त्या जागेवर कोळी समाज बांधवांची परंपरागत दफनभूमी आहे पुराव्यासाठी एकूण दहा छायाचित्रे तक्रार अर्ज सोबत जोडलेले आहेत तसेच संबंधित गट क्रमांक एक व गट क्रमांक दोन चे उतारे सुद्धा आपल्या माहितीसाठी देत आहे तसेच वेळोवेळी संबंधित बांधकाम विभागाचे रावेर उपविभागीय अधिकारी तसेच ग्रामपंचायत म्हैसवाडी तसेच ठेकेदार यांना सूचना देऊन सुद्धा सुधारणा न झाल्याने आपल्याकडून चौकशी होऊन कार्यवाहीची अपेक्षा व्यक्त करीत आहोत असे दिलेल्या निवेदनात म्हैसवाडी येथील एकूण 237 पुरुष,महिला,नागरिकांनी आपली स्वाक्षरी करून नमूद केले आहे.अशा प्रकारची लेखी तक्रार असताना संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्पुरत्या स्वरूपात कागदोपत्री कारवाई दाखवून प्रत्यक्षात शून्य कारवाई केली आहे कारण संबंधित ठेकेदार हा राजकीय नेत्यांच्या सतत संपर्कात राहत असल्याने माझी कोणीही चौकशी करणार नाही असा ओव्हर कॉन्फिडन्स त्या ठेकेदाराला असल्याने तसेच ठेकेदारावर कारवाई न झाल्याने आता यापुढील पुढील कारवाईस मात्र संबंधित अधिकारी आणि तो ठेकेदार जबाबदार राहणार असल्याचे सुद्धा यावल रावेर तालुक्यातील राजकारणात आणि बांधकाम क्षेत्रात बोलले जात आहे याकडे खासदार रक्षाताई खडसे, आमदार शिरीषदादा चौधरी यांनी आपले लक्ष केंद्रित करून कोणत्याही जिल्हा परिषद सदस्याच्या राजकारणाला बळी न पडता ठेकेदाराने केलेल्या कामाची चौकशी करून कार्यवाही करावी अशी मागणी होत आहे.

जाहिरात


Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️