नाशिक (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : त्र्यंबक रोडवरील ITI सिग्नल जवळ चालत्या रिक्षावर गुलमोहराचे वृक्ष उन्मळून पडल्याने चालकासह प्रवासी महिलेचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी घडली.पोपट सोनवणे (Popat Sonawane) व शैला पटणी (Shaila Patni) असे मयत यांची नावे आहे.[ads id="ads2"]
अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तातडीने धाव घेतली व रिक्षात अडकलेल्या दोघांना रुग्णालयात उपचारासाठी पाठवले. मात्र डॉक्टरानी त्यांना मृत घोषित केले.
हेही वाचा :- सख्ख्या पुतण्याने काकूला चिरडले : जळगाव जिल्ह्यातील घटना
ही रिक्षा नाशिक शहरातून (Nashik City) सातपूरकडे(Satpur) निघाली होती. चालत्या रिक्षेवर अचानक झाड पडल्याने दोघांनाही जीव गमवावा लागला आहे. मान्सूनपूर्व काम पूर्ण न केल्याने हा अपघात घडला असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी या वेळी केला.