आँनलाईन प्रणालीमुळे गणवेश वाटपला विलंब : गटशिक्षणअधिकारी एन.के.शेख

 


 मनवेल ता.यावल (गोकुळ कोळी)  : जि.प.प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी गणवेश वितरण करण्याचा आदेश जि.प.चे मुख्यकार्यकारी अधिकारी पंकज आशिया यांचे आदेश होते मात्र आँनलाईन प्रणालीमुळे गणवेश वाटप रखडले असल्याचे यावल प.स.गटशिक्षणअधिकारी एन.के.शेख यांनी दिली.

जि.प.शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश मिळणार कधी या मथळ्याखाली   सुवर्ण दिप न्युज मध्ये बातमी प्रसिद्ध होताच एकच खळबळ उडाली.

गणवेश वाटप करण्याची प्रक्रिया शाळा उघळण्याचा अगोदर राबवून शाळेच्या पहिल्या दिवशी गणवेश वाटप करण्याचे नियोजन सर्व शाळांना देण्यात आले होते मात्र गणवेश वाटप करण्यासाठी शासनाकडुन येणारा निधी पी.एफ.एम.एस प्रणाली नुसार आला असून त्याला उशिर झाल्याने गणवेश वाटप नियोजन नुसार झाले नाही.

गणवेश वाटप करीता निविदा काढणे, विद्यार्थ्यांचे माफ घेणे व टेलर लोकांची आँनलाईन व्यवहार करण्यासाठी बँक खात्याच्या अडचणी येत असल्यामुळे गणवेश वाटप रखडले असल्याचे सागण्यात आले.

   आँनलाईन  सुवर्ण दिप न्युज मध्ये मध्ये आलेले वृत्त वाचून गटशिक्षणअधिकारी एन.के.शेख यांनी तालुक्यातील सर्व केद्र प्रमुख यांना शालेय गणवेश वाटप प्रकीया अहवाल प्रत्येक शाळेतील मुख्यध्यापक यांचा कडुन मागीतला असून तालुक्यातील सर्व शाळांना विद्यार्थ्यांना गणवेश वाटप लवकर करण्याचा सुचना देणार असल्याचे गटशिक्षणअधिकारी एन.के.शेख यांनी दिली.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️