चार्जशीट साठी चार हजार रुपयांची लाच घेताना चाळीसगावातील दोघे पोलिस एसीबी च्या जाळ्यात

 


सासरच्या लोकांनी फ्लॅट घेण्यासाठी विवाहितेकडून हुंडा मागितला होता. याप्रकरणी विवाहितेने दाखल केलेल्या गुन्ह्यात कागदपत्रात मदत करणे आणि लवकर चार्जशीट पाठवण्याच्या मोबदल्यात चार हजार रुपयांची लाच घेताना दोन पोलिस कर्मचाऱ्यांना मंगळवारी रात्री नऊ वाजता चाळीसगावात रंगेहाथ अटक करण्यात आली.[ads id="ads2"]

सहायक फौजदार अनिल रामचंद्र अहिरे (वय ५२, रा. वैष्णवी पार्क, चाळीसगाव) व पोलिस नाईक शैलेश आत्माराम पाटील (वय ३८, रा. चाळीसगाव) असे लाच घेणाऱ्या पोलिसांचे नाव आहे. घटना अशी की, तक्रारदार यांच्या मुलीने चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात सासरची मंडळी हुंडा मागून छळ करीत असल्याचा गुन्हा दाखल केला आहे. [ads id="ads1"]

. या गुन्ह्याच्या कागदपत्रांसाठी मदत करू, असे सांगून चार्जशीट लवकरात लवकर पाठवण्याच्या मोबदल्यात दोन्ही पोलिसांनी तक्रारदाराकडे पाच हजार रुपयांची लाच मंगळवारी मागितली. तडजोड झाल्यानंतर चार हजारांची लाच देण्याचे ठरले.

दरम्यान, तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार केली होती. यानंतर रात्री चाळीसगाव शहरातील एका चहाच्या हॉटेलमध्ये दोघांनी चार हजार रुपयांची लाच स्वीकारली. या वेळी सापळा रचून बसलेले पोलिस उपअधीक्षक शशिकांत पाटील, पोलिस निरीक्षक एन. एन. जाधव, संजोग बच्छाव, दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, अशोक अहीरे, सुनील पाटील, रवींद्र घुगे, शैला धनगर, मनोज जोशी, जनार्दन चौधरी, सुनील शिरसाठ, प्रवीण पाटील, महेश सोमवंशी, नासीर देशमुख, ईश्वर धनगर व प्रदीप पोळ यांच्या पथकाने दोघांना रंगेहाथ अटक केली. दोघांविरुद्ध चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईमुळे पोलिस स्थानकासह शहरात खळबळ उडाली आहे.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️