सख्ख्या पुतण्याने काकूला चिरडले : जळगाव जिल्ह्यातील घटना

 


पारोळा तालुक्यातील शेळावे खुर्द येथे कौटुंबिक भांडण उफाळल्यानंतर सख्या काकूलाच पुतण्याने छोटा हत्ती वाहनाखाली चिरडल्याने काकूचा मृत्यू झाला तर अन्य तिघे जखमी झाले.शुक्रवार, 10 रोजी सकाळी ही धक्कादायक घटना घडली. या घटनेत अलकाबाई बापू सांगळे (45) यांचा मृत्यू झाला तर विद्या महेंद्र सांगळे, मनिषा दत्तु सांगळे, अविनाश प्रभाकर सांगळे (सर्व रा.शेळावे, ता.पारोळा) हे जखमी झाले.[ads id="ads1"] 

पाण्यावरून वाद गेला विकोपाला

पारोळा तालुक्यातील शेळावे खुर्द येथील बापू सांगळे यांचा सख्खे भाऊ दत्तू सांगळे यांच्यासोबत गेल्या सुमारे सात वर्षांपासून वाद सुरू आहे. या दोन्ही भावांची शेती लागून असून विहिरीवर पाणी भरण्याचा सामयिक अधिकार आहे मात्र या दोन्ही भावांमध्ये बांधासह पाणी भरण्यावरून वाद सुरू आहेत.[ads id="ads2"] 

   शुक्रवार, 10 जून रोजी सकाळी पाणी भरण्यावरून दोन्ही कुटुंबांमध्ये वाद झाला. यात अलकाबाई बापू सांगळे, विद्या महेंद्र सांगळे, मनीषा दत्तू सांगळे, दत्तू सांगळे हे आपापल्या शेतात काम करत असतांना पाण्याचा पंप बंद केल्यावरून महिलांमध्ये जोरदार हाणामारी झाली. यात विद्या सांगळे व मनीषा सांगळे या जखमी झाल्या. 

हेहे वाचा : - रस्त्यावरील झाड रिक्षावर कोसळल्याने चालकासह प्रवाशी महिलेचा जागीच मृत्यू 

यानंतर दत्तू सांगळे यांचा मुलगा राहुल उर्फ सोनू सांगळे याने त्याच्या मालकीचा छोटा हत्ती वाहन (एम.एच. 19 सी.वाय. 8183) भरधाव वेगाने चालवून काकू अलकाबाई बापू सांगळे यांच्या अंगावर घातले यामुळे अलकाबाई यांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य तिघे जखमी झाले.

आरोपी पुतण्याविरोधात गुन्हा

राहुल उर्फ सोनू सांगळा याला पारोळा पोलिसांनी अटक केली असून त्याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा तपास सहाय्यक निरीक्षक राजू जाधव करीत आहेत.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️