अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाकडून डॉ. सुनील दादा पाटील यांना दोन पुरस्कार

 


कोल्हापूर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) जयसिंगपूर येथील नामांकित लेखक - संपादक आणि प्रकाशक डॉ. सुनील दादा पाटील यांना अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाकडून उत्कृष्ट ग्रंथ निर्मितीसाठी नुकतेच दोन पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघातर्फे दरवर्षी प्रकाशकांसाठी उत्कृष्ट ग्रंथ निर्मितीसाठी पुरस्कार विविध विभागात दिले जातात. सांस्कृतिक - साहित्यिक चळवळीतून डॉ. सुनील दादा पाटील यांचे अभिनंदन होत आहे.  [ads id="ads1"] 

 अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ, पुणे ही संस्था लेखक आणि प्रकाशकांची अखिल भारतीय स्तरावरील शिखर संस्था आहे. मराठी प्रकाशन क्षेत्रात सुपरिचित असलेल्या काही व्यावसायिकांनी १९९६ च्या विजयादशमीच्या दिवशी ‘अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघा’ची स्थापना पुणे येथे केली व संस्थेची, सोसायटीज रजिस्ट्रेशन अॅक्ट व ट्रस्ट अॅक्ट या कायद्यानुसार रीतसर नोंदणी केली. आज मराठीतील बहुतेक सर्व मान्यवर प्रकाशन संस्था अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाचे सभासद आहेत. [ads id="ads2"] 

  अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ ही मराठी प्रकाशकांची प्रातिनिधिक संस्था झालेली आहे. महाराष्ट्रातील अनेक ग्रंथ विक्री योजनात आणि राष्ट्रीय पातळीवर फेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशर्स तर्फे आयोजित अनेक प्रदर्शने व ग्रंथविषयक कार्यक्रमात संघाने मराठी प्रकाशकांचे प्रतिनिधित्व केले आहे. फेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशर्स या भारतीय प्रकाशकांच्या मध्यवर्ती संस्थेशी अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ संलग्न आहे.

 अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाकडून उत्कृष्ट ग्रंथ निर्मितीसाठी विविध विषयानुसार पुरस्कार दिले जातात. कवितासागर पब्लिशिंग हाउस, जयसिंगपूर यांनी प्रकाशित केलेल्या ‘शब्दवेल कवितासागर ग्रंथसूची २०२१’ या ग्रंथसूचीसाठी ‘जाहिरात व प्रचार साहित्य’ या विभागातील उत्कृष्ट ग्रंथ निर्मितीसाठी अतिशय प्रतिष्ठेचा समजला जाणारा ‘प्रथम पुरस्कार’ देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे सलग दुसर्‍या वर्षी अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाकडून ‘जाहिरात व प्रचार साहित्य’ या विभागातील उत्कृष्ट ग्रंथ निर्मितीसाठी प्रथम पुरस्कार त्यांना प्राप्त झाला आहे. 

 तर दुसर्‍या पुरस्कारासाठी सांगली जिल्ह्यातील ग्रामीण कथा लेखक आनंदा तुकाराम बरगुले यांच्या ‘वादळ’ या ग्रामीण कथासंग्रहास ‘ग्रामीण / निमशहरी’ या विभागातील उत्कृष्ट ग्रंथ निर्मितीसाठी प्रथम पुरस्कार देण्यात येणार आहे. सदर दोन्ही पुस्तकांची प्रथम आवृत्ती संपली असून लवकरच नवीन स्वरुपात दुसर्‍या आवृत्तीचे काम पूर्ण होणार असल्याची माहिती प्रकाशक डॉ. सुनील दादा पाटील यांनी दिली.  


 डॉ. सुनील दादा पाटील यांचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक संशोधनात्मक ग्रंथ प्रकाशित झाले. यातील काही ग्रंथांच्या विशेष निर्मितीसाठी विविध विक्रमांची नोंद त्यांच्या नावावर झालेली आहे. 

 अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाचे लेखक-प्रकाशक साहित्य संमेलन सातारा येथे लवकरच संपन्न होत आहे. या संमेलनात हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. संमेलनातील कोणत्या दिवशी व कोणत्या सत्रात सदर पुरस्कार प्रदान सोहळा पार पडेल ते लवकरच जाहीर करत आहोत. अशी माहिती अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाच्या कार्यकारिणीने पत्रकाद्वारे दिली आहे. 

 डॉ. सुनील दादा पाटील यांच्या साहित्य विषयक आणि ग्रंथालयीन सेवेच्या विशेष योगदानासाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी यापूर्वी सन्मानित करण्यात आले असून प्रधानमंत्री कार्यालयाने वेळोवेळी अनेक लेखी पत्र पाठवून त्यांच्या पुस्तकांचे कौतुक केले आहे. अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाकडून यावर्षी मिळणार्‍या दोन उत्कृष्ट ग्रंथ पुरस्कारासाठी त्यांचे अनेकांनी अभिनंदन केले असून सर्वत्र कौतुक होत आहे.

जाहिरात


Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️