दुसर्‍याच्या नावावर जमीन परस्पर केल्याप्रकरणी तलाठी, सर्कलसह दोघांवर गुन्हा

 


जळगाव (सुवर्ण दिप वृत्तसेवा) मृत व्यक्तीची जमीन परस्पर दुसर्‍याच्या नावे केल्याचे प्रकरण येथे उघड झाले असून या संदर्भात तलाठी(Talathi), सर्कल(Circle) यांच्यासह अन्य दोघांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शेंदुर्णी (Shendurni Taluka Jamner) येथील वाडी दरवाजा भागातील रहिवासी व शेतकरी जिजाबाई देविदास माळी (वय ५५) यांनी या संदर्भात पहुर पोलिस ठाण्यात (Pahur Police Station) फिर्याद दिली आहे. [ads id="ads1"] 

  त्यात म्हटले आहे की, त्यांचे पती देविदास गोविंदा माळी यांचे २८ एप्रिल २०२१ रोजी निधन झाले. पतीच्या मृत्युनंतर त्यांनी ई-सेवा केंद्रावर जाऊन मृत देविदास माळी यांच्या नावे असलेला उतारा काढला. त्यात मृत पतीसह जनाबाई गेविंदा माळी यांच्या नावाचा सामाईक उतारा मिळाला. [ads id="ads2"] 

  हे पाहून जिजाबाई यांनी तलाठ्यांना विचारणा केली असता या जमिनीचे न्यायालयात वाद असल्याचे सांगितले होते. या प्रकरणी जिजाबाई माळी यांच्या फिर्यादीवरुन अफरातफर करुन फसवणूक केल्याप्रकरणी तलाठी (Talathi)  शांतीलाल नाईक व मंडळ अधिकारी (Circle) हर्षल विश्वनाथ पाटील यांच्यासह जनाबाई माळी व अन्य एकावर पहूर पोलिसांत गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा पुढील तपास पहूर पोलीस स्थानकाचे तपास पोलिस निरीक्षक प्रतापराव इंगळे व सहकारी करत आहेत.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️