ऐनपुर येथे मरीमाता यात्रोत्सव साजरा; बारा गाड्यांची परंपरा कायम

 


ऐनपुर प्रतिनिधी (विजय एस अवसरमल)

ऐनपुर येथे मरीमाता यात्रोत्सव साजरा करण्यात आला.सविस्तर वृत्त असे की ऐनपुर ता.रावेर येथे दिनांक ०४/०५/२०२२ रोजी मरीमाता यात्रोत्सव निमित्त बारा गाड्या ओढण्याचे आयोजन करण्यात आले होते या यात्रेचे शतकोत्तर वर्षांची परंपरा असलेल्या या यात्रेत कोरोना काळात दोन वर्षांचा खंड पडला होता.[ads id="ads1"] 

   या दोन वर्षांच्या खंडानंतर पहील्यांदाच ऐनपुर गावातील तथा पंचक्रोशीतील अबाल ऋध्द बालबालिका व नागरीकांनी सहभागी होऊन यात्रेचा आनंद घेतला बारा गाड्या ओढण्याचे काम वर्षानुवर्षे भगत नामदेव भिल्ल हे करीत असुन या वर्षी सुध्दा हा मान त्यांना च मिळाला त्यांना सहकार्य म्हणून बगले सुनिल महाजन व सतिष अवसरमल यांची साथ होती .[ads id="ads2"] 

यावेळी ऐनपुर येथील पोलिस पाटील दिपाली तायडे सरपंच अमोल महाजन यांनी बारा गाड्या ची पुजा केली यावेळी जगन्नाथ शामू पाटील, भगवान महाजन, मिलिंद अवसरमल,विलास अवसरमल, सुनिल महाजन, निलेश जैस्वाल, कमलेश महाजन, माजी पं. स.सदस्य दिपक पाटील छोटु पाटील निंभोरा सरपंच सचिन महाले ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी,तसेच पत्रकार इक्बाल पिंजारी, विजय एस अवसरमल, विजय के अवसरमल, श्रीराम पाटील, ज्ञानेश्वर महाजन, तसेच गावातील व परिसरातील नागरिक उपस्थित होते यावेळी निंभोरा पोलीस स्टेशन चे सहा.पोलीस निरीक्षक गणेश धुमाळ साहेब,यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.काँ.ज्ञानेश्वर चौधरी,बापु पाटील,किरण जाधव तसेच होमगार्ड यांनी चौक बंदोबस्त केला

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️