रावेर तालुक्यातील भामलवाडी येथील ४० वर्षीय शेतक-याची गळफास घेऊन आत्महत्या

 रावेर तालुक्यातील भामलवाडी येथील ४० वर्षीय शेतक-याची गळफास घेऊन आत्महत्या


रावेर तालुक्यातील भामलवाडी (Bhamalwadi Taluka Raver) येथील ४० वर्षीय शेतक-याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे.[ads id="ads1"] 

या बाबत वृत्त असे की भामलवाडी ता.रावेर (Bhamalwadi Taluka Raver)  येथील शेतकरी विजय पाटील (वय ४०) यांनी घरात कोणीही नसतांना गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मयत विजय पाटील यांना दोन मुले, पत्नी,आई असून गावात एकच हळहळ व्यक्त होत आहे.[ads id="ads2"] 

  या बाबत निंभोरा पोलिसात (Nimbhora Police Station) अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हे.कॉ. ज्ञानेश्वर चौधरी करीत आहे. कर्जबाजारीला कंटाळुन आत्महत्या केली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️