बोदवडमधील लाचखोर तहसीलदारांसह चौघांची पोलिस कोठडीत रवानगी

 


वाळू ठेकेदाराकडून मासिक हप्त्याची आणि वाहनावर कारवाई न करण्यासाठीच्या आठ हजारांची लाच घेताना बोदवड तहसीलदारांसह चौघांना जळगाव एसीबीने शुक्रवारी दुपारी अटक केली होती. अटकेतील चौघा लाचखोरांना भुसावळ अतिरीक्त सत्र न्यायालयात शनिवारी दुपारी हजर केले असता त्यांना दोन दिवसांची (4 मार्चपर्यंत) पोलिस कोठडी सुनावण्यात आली.[ads id="ads1"] 

दोन वर्षात दुसरा तहसीलदार जाळ्यात

विशेष म्हणजे बोदवडमधील लाचखोर तहसीलदार योगेश्वर नागनाथराव टोंपे यास जळगावला जिल्हाधिकारी कक्षात जात असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक करण्यात आली. तहसीलदारांचा ध्वनिमुद्रित झालेला आवाज पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात आला आहे. दोन वर्षात बोदवडमध्ये दुसर्‍या लाचखोर तहसीलदारांवर ही कारवाईची वेळ आहे.  [ads id="ads2"]  

  दरम्यान, टोपें तहसीलदार आणि नायब तहसीलदार यांच्या प्रलंबित मागण्या मान्य व्हाव्यात म्हणून संघटनेने केलेल्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी टोपे शुक्रवारी जळगावात आले होते. काळ्या फिती लावून त्यांनी आंदोलन केले आणि नंतर शिष्टमंडळाबरोबर ते जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यासाठी जात होते. त्याचवेळी पथकाने त्यांना ताब्यात घेतले.

या आरोपींना एसीबीकडून अटक : न्यायालयाने सुनावली कोठडी

तहसीलदार योगेश्वर नागनाथराव टोंपे (32, रा.केअर ऑफ के.जे. पाटील संताजी नगर, मुक्ताईनगर, मूळ रा.शिवकृपा निवास, शारदा नगर, देगलूर, जि.नांदेड), तहसीलदारांच्या वाहनावरील चालक अनिल रावजी पाटील (51, रा.चिखली, ता.बोदवड), बोदवड तलाठी मंगेश वासुदेव पारीसे (31, रा.राजा चंद्रकांत सोसायटी, बोदवड) व खाजगी पंटर शरद समाधान जगताप (25, रा.रूप नगर, बोदवड, ता.बोदवड) यांना लाच प्रकरणी जळगाव एसीबीने शुक्रवारी अटक केली होती. दरम्यान, अटकेतील आरोपींना शनिवारी भुसावळ अतिरीक्त सत्र न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. पोलिस उपअधीक्षक शशीकांत पाटील यांच्या नेतृत्वात निरीक्षक एन.एन.जाधव यांनी एसीबीतर्फे बाजू मांडली.

आठ हजारांची लाच भोवली

34 वर्षीय तक्रारदार यांचा वाळु वाहतुकीचा व्यवसाय आहे. त्यांचे वाळू वाहतूक करणारे ढंपर 26 मार्च रोजी बोदवड तहसीलदारांनी बोदवड तालुका हद्दीतील सिंधी ते सुरवाडे गावाच्या दरम्यान रात्री थांबवले व सदर ठिकाणी तहसीलदार हे वाहनात बसलेले असतांना त्यांचा चालक व सोबत असलेला त्यांचा खाजगी पंटर यांनी नियमित हप्त्याचे 23 हजार रुपये जागेवरच वसुल केले शिवाय वाहन सोडण्यासाठी दहा हजार रुपये लाचेची मागणी केली तसेच बोदवड तलाठी मंगेश पारीसे यांनी सुध्दा डंपरने वाळू वाहतूक करू देण्यासाठी दर महिन्याला तीन हजार रुपयांप्रमाणे लाच मागितली होती. याबाबत तक्रारदाराने जळगाव एसीबीकडे तक्रार नोंदवली होती.

लाच स्वीकारताच आवळल्या होत्या मुसक्या

शुक्रवारी सायंकाळी बोदवड तहसील कार्यालयात एसीबीने लावलेल्या सापळ्यानंतर तहसीलदार व चालक यांनी पाच हजार रुपये स्वीकारले तर तलाठी यांच्या सांगण्यावरून खाजगी पंटराने तीन हजारांची लाच स्वीकारल्याने एकाचवेळी चौघांच्या मुसक्या आवळण्यात आल्या होत्या.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️