अधिकाऱ्यांचा वचक न राहिल्यामुळे यावल शहराची शांतता धोक्यात....? वरिष्ठ अधिकाऱ्यांची होत आहे दिशाभूल.

 यावल दि.23(सुरेश पाटील) शहरात,यावल पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात तसेच तालुकास्तरीय काही अधिकाऱ्यांचा आपल्या कार्यक्षेत्रातील कर्मचाऱ्यांवर शासकीय कामकाजात वचक न राहिल्यामुळे तसेच विविध विभागात काही कर्मचारी एकाच ठिकाणी ठाण मांडून असल्याने त्यांचे हितसंबंध वाढल्यामुळे आणि हे काही कर्मचारी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना चुकीची माहिती देऊन सोयीनुसार कामकाज करीत असल्याने त्यांच्या कर्तव्यात जाणून बुजून दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांना त्यांचे विपरीत परिणाम भोगावे लागत आहेत,काही अप्रिय घटना घडत असल्यामुळे यावल शहर व परिसरातील शांतता कायदा सुव्यवस्था धोक्यात आली आहे.[ads id="ads1"] 

        यावल शहर व परिसरात काही संबंधित अधिकारी व कार्यालयीन कर्मचारी यांच्याकडे कार्यालयीन एकाच प्रकारची एकाच ठिकाणची जबाबदारी निश्चित करून दिल्याने तसेच दुसऱ्या कर्मचाऱ्यांना कर्तव्याची संधी दिली जात नसल्याने त्याची त्याच्या कर्तव्याशी संबंधित नागरिक,व्यवसायिक,अवैध धंदेवाले,अतिक्रमित जागांवर व्यवसाय करणारे,अवैध प्रवासी वाहतूक,अवैध गौण खनिज वाहतूक आणि इतर चुकीची कामे करणाऱ्यासोबत घनिष्ठ संबंध आणि ओळख परिचय झाल्याने त्याचा विपरीत परिणाम नागरिकांना भोगावा लागत आहे.[ads id="ads2"] 

          यावल नगरपालिकेत पाणीपुरवठा करताना नियोजन नसल्याने तसेच अनियमित अल्पप्रमाणात कमी दाबाने काही ठिकाणी पाणीपुरवठा होत असल्याने तसेच काही ठिकाणी वाजवीपेक्षा जास्त प्रमाणात पाणीपुरवठा पुरवठा होत आहे.

अशा परिस्थितीत यावल शहरात बोरावल दरवाजा परिसरात पाण्याच्या वादात झालेल्या भांडणात काल दि.22रोजी कुर्‍हाडीने मारहाण झाल्याने एकाच कुटुंबातील सहा जण जबर जखमी झाल्याच्या कारणावरून सात जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला. 

    8 दिवसापूर्वी विकत घेतलेली पॅन्ट एका रेडिमेट दुकानदाराने दि. 21 रोजी बदलून देण्यास विरोध केल्याने यावल शहरातील तीन ते चार जणांनी रेडिमेट दुकानदारास व त्याच्या भावास लाकडी दांडक्याने जबर मारहाण करून दुखापत केल्याची घटना घडली.

          शुक्रवार दि.22 रोजी आठवडे बाजाराच्या दिवशी बोरावल रस्त्यावर एक ॲपे रिक्षा उलटून रिक्षा चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.

यावल पोलीस स्टेशन हद्दीत याप्रकारे अनेक प्रवासी वाहने अनधिकृतपणे प्रवासी वाहन परवाना नसताना तसेच 95 टक्के वाहनांचे आयुर्मान संपलेले असताना सर्रासपणे अनधिकृत वाहतूक सुरू आहे,मोठ्या प्रमाणात जडवाहनांची व इतर अनेक वाहनांची,प्रवाशांची, नागरिकांची वर्दळ असलेल्या भर रस्त्याला लागून रस्त्यावर वाहनांची अनधिकृत पार्किंग केलेली असते,टी पॉइंटवर आणि आई हॉस्पिटल जवळ अनेक वाहने बेशिस्तपणे रस्त्यावर पार्किंग असल्यामुळे वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत आहे.

         यावल महसूल कार्यक्षेत्रात अवैध गौण खनिजाची वाहने सर्रासपणे वाहतूक करीत असतात ही वाहने सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये आणि नागरिकांच्या नजरेत कैद होत असले तरी मात्र महसूल विभाग व त्यांचे कर्मचारी आंधळ्याची भूमिका घेत आहेत.

           सार्वजनिक बांधकाम उपविभाग यावल तसेच यावल नगर परिषद बांधकाम शाखा अभियंता यांच्यासमक्ष त्यांच्या कार्यक्षेत्रात अनधिकृतपणे बेकायदा बांधकामे सुरू आहेत आणि झालेली आहेत काही ठिकाणी अतिक्रमणामुळे नगरपरिषदेच्या गटारीचे बांधकाम प्रलंबित असले तरी यावल नगरपालिका याबाबत संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करीत नसल्याने नगरपालिकेच्या कामकाजाबाबत दाट संशय व्यक्त करण्यात येत आहे.

    यावल ग्रामीण रुग्णालयातील विविध उपक्रमाची माहिती रुग्णांच्या माहितीसाठी प्रसिद्धीमाध्यमांना एकाच वेळेला दिली जात नसल्याने लाभार्थी रुग्णांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे गेल्या महिन्यात घे आरोग्य शिबिर घेण्यात आले होते त्यात एका रुग्णाची शुद्ध दिशाभूल आणि फसवणूक संबंधितांनी कशी केली याबाबत सुद्धा यावल शहरात जोरदार चर्चा सुरू आहे.

       यावल नगरपालिकेतर्फे दररोज ओला व सुका कचरा संकलित करून वाहतूक करण्याचा ठेका एका ठेकेदाराला दिला असला तरी गेल्या तीन दिवसापासून तो ठेकेदार घनकचरा संकलित करीत नसल्याने तसेच तो ठेकेदार आपले बिल मात्र नगरपालिकेतुन पूर्ण काढून घेत असल्याने यावल शहरात फालकनगर,तिरुपती नगर, गंगानगर इत्यादी परिसरात मोठा तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

        अशा अशाप्रकारे वस्तुस्थिती निर्माण होत असल्याने आणि संबंधित काही अधिकारी कर्मचारी हे आपल्या एकाच जागेवर ठाण मांडून असल्याने वरिष्ठ अधिकारी त्यांच्या जागेवर नवीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करीत नसल्याने या सर्वांचे साटेलोटे आणि वैयक्तिक संबंध प्रस्थापित झाल्याने ठोस कायदेशीर कारवाई केली जात नाही त्यामुळे यावल शहराची कायदा-सुव्यवस्था जातीय सलोखा शांतता धोक्यात आली असल्याचे संपूर्ण यावल परिसरात बोलले जात आहे.


जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️