स्वच्छ भारत मिशनमध्ये बीडीओ दीपाली कोतवाल यांच्या कार्यकाळातच घोळ कसा होतो?

रावेर( प्रतिनिधी) रावेर पंचायत समिती मार्फत राबविण्यात येणाऱ्या स्वछ भारत मिशन मध्ये वैयक्तिक शौचालय लाभ वाटप प्रकरणी गुन्हा दाखल होऊन खळबळ उडाली असतांना एकीकडे रावेर बीडीओ दीपाली कोतवाल यांच्यावर काही वृत्तपत्रे अभिनंदनाचा वर्षाव करीत असले तरी स्वछ भारत मिशन आणि दीपाली कोतवाल म्हणजे भ्रष्टाचाराचे प्रकरण आलेच, असा आरोप भडगाव येथील सामाजिक कार्यकर्ते विजय दोधा पाटील हे करीत आहेत.[ads id="ads1"] 

   भडगाव येथेही दीपाली कोतवाल यांचे स्वछ भारत मिशन संबधीचे कामकाज वादग्रस्त ठरले होते. तक्रारदार पाटील सदर प्रकरणी न्यायालयात देखील गेल्याचे समजते. स्वछ भारत मिशन प्रकरणी आपल्या अडचणी वाढून स्वतः वरील कारवाई टाळण्यासाठी दीपाली कोतवाल ह्या या साखळीतील काही अधिकाऱ्यांशी, पदाधिकारी यांचेशी हातमिळवणी करून कर्मचाऱ्यांचा बळी घेतात, असे भडगाव येथील तक्रारदार यांचे म्हणणे आहे. [ads id="ads2"] 

  रावेर येथे सध्या तरी तोच प्रकार सकृतदर्शनी दिसून येत आहे. बीडीओ कोतवाल यांनी अर्थ विभागाला सांभाळून कंत्राटी कर्मचारी यांचाच बळी दिल्याची चर्चा पंचायत समिती रावेर येथील कार्यालयातील कर्मचारी यांच्यात सुरू आहे. दीपाली कोतवाल यांच्या दीड वर्षाच्या कार्यकाळात जर इतकी अनागोंदी सुरू होती तर बीडीओ यांना कारवाईसाठी इतका उशीर का लागावा? पंचायत समिती येथील वरिष्ठ अधिकारी यात सहभागी असल्याशिवाय इतका मोठा घोटाळा होणे शक्यच नाही, अश्या प्रतिक्रिया लोक म्हणूनच व्यक्त करतांना दिसत आहेत.



जाहिरात


Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️