डिवायएसपी पथकाने उधळल्या दारू भट्ट्या
2100 लिटर हातभट्टी दारूचा मिळाला माल
यावल (सुरेश पाटील) तालुक्यातील फैजपूर उपविभागीय अधिकारी तथा डीवायएसपी कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली डीवायएसपी पोलीस पथकाने काल दि.9रोजी यावल पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात यावल पोलीस स्टेशन पासून 9 ते 10 किलोमीटर अंतरावर पिंप्री शिवारात तापी नदी पात्राचे काठवर एकूण 3 ठिकाणी एकाच दिवशी धाडी टाकून गुळ,मोह मिश्रित कच्चे-पक्के रसायन एकूण 2100 लिटर,हातभट्टीची दारू 75 लिटर व इतर साहित्य असा एकूण 42 हजार रुपयांचा माल हस्तगत केला.[ads id="ads1"]
यामुळे यावल पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात अवैध धंदे चालकांसह यावल पोलीस दलात मोठी खळबळ उडाली. डिवायएसपी पथकाने कारवाई केल्याने यावल पोलीस दलात खांदेपालट होत नसल्याने तसेच काही ठराविक पोलिसांनाच काही महत्त्वाची कामे दिली जात असल्याने आणि गेल्या पाच दिवसापूर्वी यावल पोलीस स्टेशनला हजर झालेले परिविक्षाधीन आयपीएस अधिकारी अशित कांबळे यांची काही पोलिसांकडून शुद्ध दिशाभूल केली जात असल्याने तसेच चुकीची माहिती देण्यात येत असल्याने अवैध धंदे तेजीत आले आहेत अशी चर्चा संपूर्ण यावल तालुक्यात सुरु झाली आहे.[ads id="ads2"]
याबाबत सविस्तर अशी की काल दि.9 शनिवार रोजी डीवायएसपी कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार अविनाश चौधरी, पो.हे.का.दिलीप तायडे,पो.का. अशोक जवरे,पो.ना.का.किशोर परदेशी,संदीप सूर्यवंशी यांनी यावल पोलीस स्टेशन पासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या पिप्री शिवारात तापीनदी पात्राचे काठवर धाडी टाकून संशयित आरोपी आकाश निवृत्ती कोळी,पांडुरंग प्रकाश सपकाळे,दिलीप पुन्हा कोळी तिन्ही राहणार पिप्रि तालुका यावल यांच्या ताब्यातील वेगवेगळ्या तीन ठिकाणाहून एकूण 2100 लिटर गुळ,मोह मिश्रित रसायन,एकूण 75 लिटर गावठी हाथभट्टीची दारू एकूण अंदाजे किंमत 42 हजार रुपयाचा माल हस्तगत करुन आरोपींनी गैर कायदा हातभट्टीची दारू घालण्याची भट्टी रचून दारू गाळीत असताना वरील वर्णनाचा व किमतीचे कच्चे-पक्के रसायन तसेच तयार दारू तसेच भट्टीचे सर्व साधने कब्जात बाळगीत असताना दारू गाळीत असताना पोलिसांना पाहून पळून गेले सदर जागी घटनास्थळ पंचनामा करून यावल पोलीस स्टेशनला वरील तिघही आरोपीविरुद्ध अनुक्रमे पो.हे.का.दिलीप नामदेव तायडे,पो.का.सुमित गोकुळ बाविस्कर यांनी फिर्याद देऊन 0142/2022 महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम65फबकई नुसार गुन्हा नोंद केला.यामुळे यावल पोलीस दलासह संपूर्ण अवैध धंदे चालकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
फैजपूर डीवायएसपी कुणाल सोनवणे यांनी यावल पोलीस स्टेशन मधील काही ठराविक पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये खांदेपालट करून इतर पोलिसांना काम करण्याची संधी उपलब्ध करून दिल्यास अवैध धंद्यांवर, गुन्हेगारांवर नियंत्रण राहील, कारण अवैध धंदे चालक आणि काही ठराविक पोलिसांचा दांडगा जनसंपर्क आणि ओळख परिचय झाल्याने वस्तुस्थिती पोलीस निरीक्षक यांच्यापर्यंत पोचत नसल्याने याचा विपरीत परिणाम सर्वसामान्य जनतेवर होत आहे त्यामुळे डीवायएसपी यांनी यावल दलात तात्काळ खांदेपालट करावी अशी मागणी होत आहे.