अज्ञात वाहनाच्या धडकेत रावेर तालुक्यातील 55 वर्षीय वृद्ध ठार तर 1 गंभीर जखमी



 यावल तालुक्यातील आमोदा  (Amoda) गावाजवळील मोर नदीच्या पुलावर अज्ञान वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाले तर त्यांची पत्नी गंभीर जखमी झाल्याची घटना सकाळी घडली.[ads id="ads1"] 

याबाबत माहिती अशी की, गोपाळ कडू सोनवणे (वय-५५) रा. मुंजलवाडी ता. रावेर (Munjalwadi Taluka Raver)  हे त्यांची पत्नी अनिता गोपाळ सोनवणे यांच्यासह दुचाकीने भुसावळ (Bhusawal)  येथून मुंजलवाडी येथे बुधवारी २० एप्रिल रोजी सकाळी जात होते. सकाळी १० वाजेच्या सुमारास यावल तालुक्यातील आमोदा गावाजवळील मोर नदीच्या पुलावरून जात असतांना त्यांना अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या धडकेत गोपाळ सोनवणे हे जागीच ठार झाले तर त्यांची पत्नी अनिता सोनवणे ह्या गंभीर जखमी झाल्या आहे.[ads id="ads2"] 

जखमी महिलेस तातडीने यावल ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. अपघातातची माहिती मिळताच फैजपूर पोलीस (Faijpur Police) ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सिध्देश्वर आखेगावकर, स.फौ. हेमंत सांगळे, महेश वंजारी, किरण चाटे, यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. यावल ग्रामीण रूग्णालयात (Yawal Rural Hospital) शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मयताच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित मुली, एक मुलगा असा परिवार आहे. या घटनेमुळे मुंजलवाडी गावात हळहळ व्यक्त होत आहे.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️