युक्रेनमध्ये झालेल्या गोळीबारात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू

 


नवी दिल्ली : युक्रेन-रशियाच्या युद्धातून एक मोठी बातमी समोर आली आहेत. युक्रेनमध्ये गोळीबारात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची माहिती भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे.[ads id="ads1"] 

गेल्या काही दिवसापासून युक्रेन-रशियामध्ये युद्ध सुरु आहे. यात युक्रेनमध्ये अनेक भारतीय अजून अडकले आहेत. त्यांना परत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. अनेकजण युक्रेन सोडून आजुबाजुच्या देशात जाण्याचा प्रयत्न करत आहे.[ads id="ads2"] 

मात्र काही ठिकाणी त्यांची अडवणूक होत आहे. युक्रेनमध्ये रशिया आणि युक्रेनियन सैन्याकडून सतत गोळीबाबत, बॉम्बहल्ले, मिसाईल हल्ले होत आहेत.

यात आतापर्यंत अनेक युक्रेनियन नागरिक मारले गेले आहेत. यात अनेक युक्रेनच्या सैनिकांचाही मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकाही भारतीयच्या मृत्यूची बातमी समोर आली नव्हती. मात्र आजची ही बातमी खळबळ माजवणारी आहे.

 एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. शेखरप्पा ग्यानगौडा नवीन असे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. शेखरप्पा ग्यानगौडा नवीन हा मूळचा चलागेरी, कर्नाटक राज्यातील विद्यार्थी आहे. तो एमबीबीएसच्या चौथ्या वर्षात शिकत होता. किराणा विकत घ्यायला नवीन बाहेर होता आणि त्याच वेळी तिकडे मोठ्या प्रमाणात गोळीबार सुरु झाला आणि त्यात नवीनचा मृत्यू झाला.

जाहिरात


Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️