युक्रेन मधून जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील विद्यार्थी परतला ; आई वडिलांच्या डोळ्यात आले आनंदाश्रू

 

रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरु झाले. आणि तो युक्रेनमध्ये अडकला. रोज होणारे मोठमोठे बॉम्बस्फोट अन् फायरिंग...टीव्हीवर युद्धाच्या बातम्या बघून आई-वडिलांच्या काळजाचे ठोके वाढले. मात्र केंद्र शासनाच्या मदतीने युक्रेनमध्ये अडकलेला विद्यार्थी जळगावात सुखरूप परतलाय. युक्रेनमध्ये अडकलेला जळगाव जिल्ह्यातला पहिला पाचोरा येथील विद्यार्थी सूरज रवींद्र शिंदे हा जळगावात सुखरुप परताला आहे. त्याला सुखरुप पाहताच त्याच्या आई-वडिलांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू कोसळले.[ads id="ads1"] 

रेल्वे स्थानकावर त्याचे औषण करण्यात आलं. या विद्यार्थ्याचं उत्साहपूर्ण वातावरणात काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी पुष्पगुच्छ आणि हार घालून, तोंडात पेढा भरवत अनोख्या पद्धतीने स्वागत केले. यावेळी सूरजच्या आईचा संयमाचा बांध फुटला. ते क्षण पाहुण उपस्थितांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या गेल्या.[ads id="ads2"] 

रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या सहा दिवसांपासून युद्ध सुरु आहे. या युक्रेनमध्ये महाराष्ट्रातील शिक्षणासाठी गेलेले बरेचसे विद्यार्थी अडकले होते. यात जळगाव जिल्ह्यातील 15 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. त्यांना यूक्रेनमधून भारतात सुखरुप आणण्यासाठी केंद्र सरकारकडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.


या मोहिमेंतर्गत जळगाव जिल्ह्यात युक्रेनमध्ये अडकलेला पाचोरा येथील सूरज रवींद्र शिंदे हा विद्यार्थी बुधवारी सुखरुप परतला आहे. पाचोरा येथील रहिवासी रवींद्र शिंदे हे लष्करातील सेवानिवृत्त जवान आहेत. पत्नी मनिषा, मुलगा सुरज आणि एक मुलगी असा त्यांचा परिवार आहे. सूरज हा दोन वर्षांपासून युक्रेनमधील मिलेशिया या शहरात एमबीबीएसचे शिक्षण घेत आहे.


अचानक रशियाने युक्रेनमध्ये युद्ध सुरु झाल्यानंतर सूरजच्या आई-वडिलांच्या काळजाचे ठोके वाढले. त्यांचा व्हॉट्ऑपद्वारे व्हिडीओ कॉलद्वारे संपर्क होता. मात्र मुलांच्या काळजीपोटी त्याच्या आई-वडिलांना झोपही लागत नव्हती. सूरजला पाहण्यासाठी दोघांचे डोळे आतुरलेले होते.


अखेर दोन दिवसांपासून युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतातील विद्यार्थ्यांना सुखरुप परत आणण्यासाठी राबविण्यात येणार्‍या केंद्र शासनाच्या मोहिमेला वेग आला. सूरज मुंबईवरुन निघाल्याची बातमी कळताच त्याच्या आई-वडिलांचा जीव भांड्यात पडला. त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. घरी रांगोळ्यासह आकर्षक अशी सजावट करण्यात आली.

स्वागताची तयारी करण्यात आली होती. सूरज कधी पाचोरा येतोत्याला पाहतो, अशी उत्सुकता त्याच्या आई-वडिलांना लागली होती.

जाहिरात


Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️