सुवर्ण दिप न्यूज च्या बातमीनंतर रावेर तालुक्यातील तामसवाडी ग्रा.प.स्थानिक प्रशासन व आरोग्य विभाग खळबळून जागे

 

तामसवाडी ता.रावेर प्रतिनिधी (राजेश वसंत रायमळे) तामसवाडी ता.रावेर येथून काल दि.१७ मार्च २०२२ रोजी पिण्याच्या पाण्यात सडलेले कबुतरांची मुंडके या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध होताच स्थानिक प्रशासन आणि आरोग्य विभाग खळबळून जागे झाले.[ads id="ads1"] 

याबाबत अधिक वृत्त असे की,काल गुरुवार दि.१७ मार्च २०२२ रोजी तामसवाडी ता. रावेर येथे पिण्याच्या पाण्यात सडलेल्या कबुतरांची मुंडके:- अशा मथळ्याखाली  "सुवर्ण दिप न्युज" ने बातमी प्रसिद्ध करण्यात आलेली होती.[ads id="ads2"] 

तामसवाडी ता. रावेर येथील पिण्याच्या पाण्यात टाकीतून काढलेल्या ओव्हरफ्लो पाईपमधून मेलेल्या कबुतरांची सडलेली मुंडके निघालेले होते.तामसवाडी ता. रावेर येथील संपूर्ण गावासाठी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा ज्या टाकीद्वारे केला जातो, त्या टाकीतून ओव्हरफ्लो पाणी वाहून जाण्यासाठी काढलेल्या पाईपमधून मेलेल्या कबुतरांची सडलेले मुंडके बाहेर पडलेले दिसून आले होते.

  तसेच कितीक महिन्यांपासून पाण्याची टाकी धुतलेली नव्हती आधीच जागतीक महामारीने नागरिक त्रस्त आहेत त्यातच पिण्याच्या पाण्यातच ही सडलेली कबुतरे आढळून येत आहेत. व त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले दिसून येत आहे. त्यामुळे ग्रामप्रशासनाने याकडे तातडीने लक्ष घालून योग्य ती उपाययोजना करण्यात यावी अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.अशा प्रकारे सविस्तर वृत्त प्रसिद्ध करून नागरिकांच्या समस्या मांडलेल्या होत्या. 

सुवर्ण दिप न्युज ने वृत्त प्रसिद्ध होताच स्थानिक प्रशासन आणि आरोग्य विभाग खडबडून जागे झालेत.आणि योग्य त्या उपाय योजना करण्याच्या तत्काळ सूचना केल्या.त्याबद्दल गावकऱ्यांनी "सुवर्ण दिप न्यूज  चे प्रतिनिधी राजेश रायमळे व "सुवर्ण दिप न्युज" चे आभार मानले

व आरोग्य विभागाचे आरोग्य सेवक श्री.आर.एस. भालेराव यांनी म. सरपंच / ग्राम सेवक ग्राम पंचायात तामसवाडी ता. रावेर, जि. जळगांव यांचे नावे पत्रक देवून 

सदर पत्रकात पुढील प्रमाणे सूचना देण्यात आलेल्या आहेत. 

महाशय,

वरील विषयान्वये आपणास कळविण्यात येते की, आपल्या गावात पिण्यास होणा-या पाणी पुरवठा टाकी ही पाणी ओव्हरफ्लो होत असताना मेलेले कबुतर हे पिण्यास होणा-या पाणी पुरवठ्याच्या पाण्यात आढळून आले त्यामुळे पिण्यास पाणी पुरवठा हा दुषीत होणार असल्याने पिण्यास होणारा पाणी पुरवठा करु नये आणि गावात दवंडी देऊन सांगावे की आज झालेले पाणी पुरवठा कोणीही पिऊ नये.

•पिण्यास पुरवठा होणा-या टाकीत मेलेले कबुतर आढल्याने पाणी पुरवठा होणा-या टाकीतील जल साठा हा संपूर्ण रिकामा करावा पिण्यास पाणी पुरवठा होणारी टाकी ही स्वच्छ धुऊन निर्जंतुक करावे. उन्हाळा असल्याने पक्षी पाणी पिण्यास गेल्याने पिण्यास होणा-या जलसाठा मध्ये पडून मरूनपडल्याने यापुढे अशी घटना घडू नये यासाठी पाणी पुरवठा होणा-या जलसाठा टाकी वरती जाळी बसवून घ्यावी तसेच पुढील उपाय योजना कराव्या पाईप गळती व व्हॉल गळती त्वरीत काढून घ्यावे व्हॉल जमिनी पासून उंच करावे गावातील तुंबलेल्या गटारी स्वच्छ करुन वाहत्या कराव्या व गावातील उखिरडे उचलून गावा बाहेर टाकावी

१) गावातील पाण्याची साचलेली डबकी वाहती किंवा बुजवून घ्यावी.

 २) गावातून एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाडण्यात यावा त्यासाठी गावात दवंडी देण्यात यावी

३) टी सी एल योग्य जागी व योग्य स्थितीत ठेवावी व तीन महिने पुरेल ऐवढा टी सी एल साठा शिल्लक ठेवावा

४) गावात धुर फवारणी व किटकजन्य प्रतिबंधात्क औषधी फवारणी करण्यात यावी

५) गावात पाणी पुरवठा करतांना पाणी शुध्दीकरण करुनच नियमित पाणी पुरवठा करावा ६) मुख्य स्त्रोता पासून ५० फुटा पर्यंतचा परीसर स्वच्छ करून घ्यावा

७) पाण्याची टाकी दर १५ दिवसांनी धुऊन टाकी धुतल्याची नोंद रजिस्टर मध्ये घ्यावी

८) खाजगी नळ कनेक्शन गळती असल्यास त्वरीत दुरुस्त करून घ्यावे

९) ओ टी टेस्ट रजिस्टर व टी सी एल साठा रजिस्टर ठेवून नियमित भरावे.तसेच सदर पत्राच्या पुढील प्रमाणे

संविनय सादर करण्यात आलेल्या आहेत.

१) म. गट विकास अधिकारी सो पं स रावेर

२) म. तालुका आरोग्य अधिकारी सो रावेर ३) म. वैदयकिय अधिकारी प्रा आ केंद्र वाघोड 

त्याप्रमाणे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांकडून आज स्वतः हजर राहून भालेराव यांनी पाण्याची टाकी साफ करवून घेत,टाकीवर जागी बसवून घेतली व पत्रकात दिलेल्या सूचनांनुसार त्वरित अंमल करावा म्हणून सांगितले.

यावेळी आरोग्य सेवा आरोग्य.एस.भालेराव, ग्रामपंचायत सदस्य धनराज पाटील, पाणीपुरठा कर्मचारी समाधान रायमळे,रोजगार सेवक/ संगणक कर्मचारी दिपक कोळी,आणि गावचे पोलीस पाटील सुलक्षणा राजेश रायमळे व पत्रकार राजेश वसंत रायमळे उपस्थित होते. सदर काम करित असतांना धनराज पाटील, दिपक कोळी,आणि समाधान रायमळे यांनी खूप परिश्रम घेऊन जोमाने कार्य केले.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️