देसाईगंज (जि.गडचिरोली) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे ग्रामीण रुग्णालय देसाईगंज येथील १८ वर्षाखालील मुला - मुलींसाठी दि. १५/०३/२०२२ रोज मंगळवरला मोफत आरोग्य शिबीर घेण्यात आले.[ads id="ads1"]
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे ८२ रुग्णांची तपासणी करण्यात आली यामधे ११ रुग्णांना हृदयरोगाच्या शस्त्रक्रियेसाठी सुपर मल्टी-स्पेशालिटी एस.आर.सी.सी. हॉस्पिटल मुंबई येथे निःशुल्क शस्त्रक्रिया करण्यात येईल. शिबीर संपन्नतेसाठी डॉ. प्रिया प्रधान (चाइल्ड मल्टी स्पेशालिस्ट मुंबई) यांच्या हस्ते तपासणी करण्यात आली.[ads id="ads2"]
प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस आरोग्य सहायता कक्ष महाराष्ट्र प्रदेश प्रमुख गजानन साबळे , गडचिरोली जिल्हाचे निरीक्षक श्रीकांत शिवणकर ,जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, ज्येष्ठ नेते नानाभाऊ नाकाडे, बबलू हकीम, महिला जिल्हाध्यक्ष शाहीन हकीम, रायुकाँ जिल्हाध्यक्ष लीलाधर भरडकर , जिल्हा उपाध्यक्ष योगेश नांदगाये, ओबीसी जिल्हा कार्याध्यक्ष मनोज तलमले, जिल्हा संघटक सचिव संजय साळवे, ज्येष्ठ नेते शैलेश पोटुवार, कपिल बागडे, जिल्हा सचिव विलास गोटेफोडे, श्याम धाईत जिल्हा सरचिटणीस, तालुका अध्यक्ष क्षितिज उके, शहरध्यक्ष लतिफ शेख, भुवन लील्हारे, वानमाला पुस्तोडे, शिला पर्शुरामकर, द्रोपती सुखदेवे, नजमा पठाण, प्रतिभा साखरे, निशा ठाकरे आरमोरी विधानसभा निरीक्षक तसेच सदर कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता रा यु काँ चे जिल्हा सचिव केतन राऊत, रायुकॉ तालुकाध्यक्ष चिराग भागडकार, शहराध्यक्ष इम्रान शेख, रायुकॉ विधानसभा अध्यक्ष समीर पठाण, शहर कार्याध्यक्ष प्रशांत देवगिरीकर, अतिश कोहचाडे, युवकांचे नेते जयेश बनसोड, मयूर वाघाडे, अविनाश हुमने व सर्व कार्यकर्ते तसेच ग्रामीण रुग्णालयाचे कर्मचारी व डॉ. मिसार साहेब, डॉ. मेश्राम, डॉ. कोसे, अंकुश गोंडाने परिचारिका कळसे, शीतल उईके, वनिता अडव, निता वानखेडे, मुरलीधर दिवठे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.