लाचखोर कृषी सहाय्यक एसीबीच्या जाळ्यात ; दीड हजाराची लाच भोवली

 


शेतीसाठी लागणाऱ्या पावर ट्रिलर मशीनवर मिळणारी सबसीडी बँक खात्यात जमा करण्याच्या मोबदल्यात दीड हजाराची लाच घेणाऱ्या कृषी सहाय्यक अधिकाऱ्याला जळगावच्या एसीबी पथकाने रंगेहात पकडले आहे.या कारवाईमुळे कृषी विभागात मोठी खळबळ उडाली आहे.[ads id="ads1"] 

याबाबत माहिती अशी की, तक्रारदार हे पाचोरा तालुक्यातील रहिवासी असून त्यांनी त्यांच्या आईच्या नावे महाराष्ट्र कृषी विभागाची राज्य कृषी यांत्रिकीकरण योजने अंतर्गत शेती कामासाठी लागणारे बीसीएस पावर ट्रिलर मशीन घेण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज केला होता. [ads id="ads2"] 

  हा अर्ज पाचोरा तालुका कृषी अधिकारी (Pachora Taluka Krushi Adhikari) यांच्या कार्यालयाकडून मंजूर झाला होता. मशीन खरेदी केली असता सदर योजनेअंतर्गत मिळणारी ८५ हजार रुपयांची सबसिडी अर्जदाराच्या खात्यात जमा करण्याच्या मोबदल्यात पाचोरा तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील कृषी सहाय्यक (Krushi Sahayyak) ललितकुमार विठ्ठल देवरे (वय-३२) रा. आनंद नगर, प्रतिभा फ्लोअर मिल जवळ, पाचोरा याने दीड हजाराची मागणी केली होती.

   याबाबत तक्रार यांनी जळगाव येथील लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीनुसार गुरुवारी २४ मार्च रोजी पथकाने सापळा रचून दीड हजार रुपयाची लाचेची रक्कम स्विकारतांना अधिकाऱ्याला पकडले. या कारवाईमुळे पाचोरा तालुक्यात खळबळ उडाली आहे. 

  यांनी केली कारवाई

 पोलीस उपअधिक्षक शशिकांत पाटील, पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव, एन.एन.जाधव, स.फौ.दिनेशसिंग पाटील, स.फौ.सुरेश पाटील, पो.हे.कॉ.अशोक अहीरे, पो.हे.कॉ.सुनिल पाटील, पो.हे.र्को.रविंद्र घुगे, पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना.मनोज जोशी, पो.ना.जनार्धन चौधरी, पी.ना.सुनिल शिरसाठ, पो.कॉ.प्रविण पाटील, पो.कॉ.महेश सोमवंशी, पो.कॉ.नासिर देशमुख, पो.कॉ.ईश्वर धनगर पो.कॉ.प्रदिप पोळ यांनी कारवाई केली

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️